रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपकडून माढा लोकसभेचे उमेदवार - सूत्र

रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपकडून माढा लोकसभेचे उमेदवार - सूत्र

भाजपने जर रणजितसिंह निंबाळकर यांना मैदानात उतरवलं तर माढातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर असा सामना रंगणार आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 27 मार्च : काँग्रेसला रामराम ठोकत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह निंबाळकर हेच भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार असणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने जर रणजितसिंह निंबाळकर यांना मैदानात उतरवलं तर माढातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर असा सामना रंगणार आहे.

सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 'बारामतीशी आमचा थेट संघर्ष झाला,' असं म्हणत रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

'माढा मतदार संघात ज्या हालचाली होत आहेत त्यात लढवय्याची भूमिका माझी होती. कृष्णा खोऱ्याच्या स्थापणेनंतर पाणी आमच्या बॉर्डरवर आलं आहे. बारामतीकरांची इच्छा नव्हती म्हणून आमच्याकडे रेल्वे धावली नाही,' असा हल्लाबोल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला होता.

माढ्याची उमेदवारीही मिळणार

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भाजपकडून रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसलं.

शरद पवारांनी डाव टाकत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मग भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा होत होती. पण त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश केलेलल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

First published: March 27, 2019, 7:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading