शरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण

शरद पवारांनी केली तटकरेंची पाठराखण

06 जुलैगेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समर्थनासाठी अखेर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तटकरेंची पाठराखण करत तटकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय. काही नेत्यांना मीडिया समोर जास्त बोलण्याची सवय असते पण आरोप करताना काय भूमिका आहे हे पाहणंही गरजंच असते असा टोला पवारांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेता लगावला. तसेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकांनी खरं काय दे दाखवून दिलंय असंही पवार म्हणाले. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवारांनीही सुनील तटकरेंना क्लिन चीट दिली आहे.तटकरेंवरील आरोप खोटे आणि धांदड आहे असं अजितदादा म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समर्थनासाठी अखेर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तटकरेंची पाठराखण करत तटकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय. काही नेत्यांना मीडिया समोर जास्त बोलण्याची सवय असते पण आरोप करताना त्या नेत्याची काय भूमिका आहे हे पाहणंही गरजंच असते असा टोला पवारांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेता लगावला. तसेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकांनी खरं काय दे दाखवून दिलंय असंही पवार म्हणाले. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवारांनीही सुनील तटकरेंना क्लिन चीट दिली आहे.तटकरेंवरील आरोप खोटे आणि धांदड आहे असं अजितदादा म्हणाले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा मुलगा, मुलगी, सून आणि अन्य सहकार्‍यांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे शेकडो एकर जमीन रायगड जिल्ह्यात खरेदी करण्यात आली आहे. यासोबतच या कंपन्यांच्या बॅलन्सशिट तपासल्यावर मनीलाँड्रींगचा आरोपही करण्यात आलाय. सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी हे सर्व आरोप फेटाळले पण विरोधकांनी मात्र त्यांना चौकशीच्या फेर्‍यात अडकवलंय. सुनील तटकरेंनी केलेल्या गैरव्यवहारावर आता सरकार चांगलंच अडचणीत आलंय. शिवाय रायगड जिल्ह्यात आपल्या मुलाच्या नावावर असलेल्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैशाची अफरातफर केली, असा आरोप त्यांच्यावर लावला गेला. पण येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक अडचणीत येईल, हे लक्षात आल्यानंतर आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरलेतदरम्यान, सुनील तटकरेंनी पदाचा गैरवापर करुन अवैध संपत्ती जमवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन केली.तटकरेंवर झालेल्या या गैरव्यवहाराच्या आरोपांना पावसाळी अधिवेशनात त्यांना तर उत्तरं द्यावी लागतीलच, पण तटकरेंवर पांघरुन घालताना सरकारच्या मात्र नाकीनऊ येणार असंच आता दिसतंय.दरम्यान, शेकापचे आमदार जयंत पाटील, सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था, भाजपचे नेते किरीट सोमय्या या सर्वांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या नातलगांच्या कंपन्यांविरोधात, त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. इथे होणार चौकशी * एनफोर्समेंट डिरेक्टोरेट * सीबीआय * इनकमटॅक्स, मुंबई * कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री * डीआयजी, मुंबई * मुख्यमंत्री, राज्यपाल, रेव्ह्येन्यू सेक्रेटरी तर तटकरेंच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राजेंद्र फणसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था यांनी त्यामध्ये इंटरव्हीन याचिकाही दाखल केली होती. दोन जुलै रोजी यासंदर्भातला महत्वाचा निर्णय कोर्टाने दिलाय. याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली असली तरी भविष्यात कधीही यासंदर्भातली याचिका पुन्हा दाखल करण्याचे त्यांचे अधिकार अबाधित आहेत. शिवाय, यापुढे ज्या ज्या यंत्रणांकडे तटकरेंविरोधातली याचिका दाखल झालेय, त्या यंत्रणांकडून त्यांची चौकशी लवकरच सुरु होणार आहे.

  • Share this:

06 जुलै

गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समर्थनासाठी अखेर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तटकरेंची पाठराखण करत तटकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय. काही नेत्यांना मीडिया समोर जास्त बोलण्याची सवय असते पण आरोप करताना काय भूमिका आहे हे पाहणंही गरजंच असते असा टोला पवारांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेता लगावला. तसेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकांनी खरं काय दे दाखवून दिलंय असंही पवार म्हणाले. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवारांनीही सुनील तटकरेंना क्लिन चीट दिली आहे.तटकरेंवरील आरोप खोटे आणि धांदड आहे असं अजितदादा म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समर्थनासाठी अखेर खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तटकरेंची पाठराखण करत तटकरेंवरील आरोप चुकीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय. काही नेत्यांना मीडिया समोर जास्त बोलण्याची सवय असते पण आरोप करताना त्या नेत्याची काय भूमिका आहे हे पाहणंही गरजंच असते असा टोला पवारांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेता लगावला. तसेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत लोकांनी खरं काय दे दाखवून दिलंय असंही पवार म्हणाले. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवारांनीही सुनील तटकरेंना क्लिन चीट दिली आहे.तटकरेंवरील आरोप खोटे आणि धांदड आहे असं अजितदादा म्हणाले.

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा मुलगा, मुलगी, सून आणि अन्य सहकार्‍यांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे शेकडो एकर जमीन रायगड जिल्ह्यात खरेदी करण्यात आली आहे. यासोबतच या कंपन्यांच्या बॅलन्सशिट तपासल्यावर मनीलाँड्रींगचा आरोपही करण्यात आलाय. सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी हे सर्व आरोप फेटाळले पण विरोधकांनी मात्र त्यांना चौकशीच्या फेर्‍यात अडकवलंय.

सुनील तटकरेंनी केलेल्या गैरव्यवहारावर आता सरकार चांगलंच अडचणीत आलंय. शिवाय रायगड जिल्ह्यात आपल्या मुलाच्या नावावर असलेल्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैशाची अफरातफर केली, असा आरोप त्यांच्यावर लावला गेला. पण येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक अडचणीत येईल, हे लक्षात आल्यानंतर आता खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरलेतदरम्यान, सुनील तटकरेंनी पदाचा गैरवापर करुन अवैध संपत्ती जमवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन केली.

तटकरेंवर झालेल्या या गैरव्यवहाराच्या आरोपांना पावसाळी अधिवेशनात त्यांना तर उत्तरं द्यावी लागतीलच, पण तटकरेंवर पांघरुन घालताना सरकारच्या मात्र नाकीनऊ येणार असंच आता दिसतंय.दरम्यान, शेकापचे आमदार जयंत पाटील, सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था, भाजपचे नेते किरीट सोमय्या या सर्वांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या नातलगांच्या कंपन्यांविरोधात, त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. इथे होणार चौकशी

* एनफोर्समेंट डिरेक्टोरेट * सीबीआय * इनकमटॅक्स, मुंबई * कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री * डीआयजी, मुंबई * मुख्यमंत्री, राज्यपाल, रेव्ह्येन्यू सेक्रेटरी

तर तटकरेंच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राजेंद्र फणसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. सागरी किनारा सामाजिक विकास सेवा संस्था यांनी त्यामध्ये इंटरव्हीन याचिकाही दाखल केली होती. दोन जुलै रोजी यासंदर्भातला महत्वाचा निर्णय कोर्टाने दिलाय. याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली असली तरी भविष्यात कधीही यासंदर्भातली याचिका पुन्हा दाखल करण्याचे त्यांचे अधिकार अबाधित आहेत. शिवाय, यापुढे ज्या ज्या यंत्रणांकडे तटकरेंविरोधातली याचिका दाखल झालेय, त्या यंत्रणांकडून त्यांची चौकशी लवकरच सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2012 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading