IBN लोकमत इम्पॅक्ट : परभणीत 7 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

03 जुलैपावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा फायदा घेतं बियाणं विक्रेते अव्वाच्या सव्वादराने बियाणं विक्री करत असल्याचं परभणीतील कृषी केंद्राकडून होत असलेल्या लुटमारीचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केला होता. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय.परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधल्या 7 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाने आज तातडीची बैठक बोलावली आणि शहरातील 7 कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीस बजावली.24 तासाच्या बियाण्याच्या खरेदी विक्रीचा संपुर्ण तपशील, कागदपत्रे जमा करण्यास या नोटीसीद्वारे बजावण्यात आलंय. जर यामध्ये अनियमीतता आढळून आली तर संबंधीत दुकानदाराचं परवाने निलंबित करण्यात येईल असं प्रशासनाने सुनावलंय. कापसाच्या बियाण्यांची नऊशे रुपयांची बॅग बाजारात 1500 ते 2000 रुपयांप्रमाणे विकली जातेय. यात सर्वच बियाणे विक्रेत्यांनी हातमिळवणी केल्याने शेतकर्‍यांना चढ्या भावानं बियाणं खरेदी करावं लागतंय. कापूस बियाणे 'वाण : अजित - 55'ची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1550 ते 2000 रुपये किंमतीने विकले जात आहे. तर 'वाण : कनक आणि मलिका' या बियाणांची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1500 ते 2000 रुपये भावाने विकला जात आहे. याप्रकारबद्दल आता प्रशासनाने कारणेदाखवा नोटीसा दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2012 10:34 AM IST

IBN लोकमत इम्पॅक्ट : परभणीत 7 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

03 जुलै

पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा फायदा घेतं बियाणं विक्रेते अव्वाच्या सव्वादराने बियाणं विक्री करत असल्याचं परभणीतील कृषी केंद्राकडून होत असलेल्या लुटमारीचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केला होता. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय.परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधल्या 7 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाने आज तातडीची बैठक बोलावली आणि शहरातील 7 कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीस बजावली.24 तासाच्या बियाण्याच्या खरेदी विक्रीचा संपुर्ण तपशील, कागदपत्रे जमा करण्यास या नोटीसीद्वारे बजावण्यात आलंय. जर यामध्ये अनियमीतता आढळून आली तर संबंधीत दुकानदाराचं परवाने निलंबित करण्यात येईल असं प्रशासनाने सुनावलंय.

कापसाच्या बियाण्यांची नऊशे रुपयांची बॅग बाजारात 1500 ते 2000 रुपयांप्रमाणे विकली जातेय. यात सर्वच बियाणे विक्रेत्यांनी हातमिळवणी केल्याने शेतकर्‍यांना चढ्या भावानं बियाणं खरेदी करावं लागतंय. कापूस बियाणे 'वाण : अजित - 55'ची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1550 ते 2000 रुपये किंमतीने विकले जात आहे. तर 'वाण : कनक आणि मलिका' या बियाणांची मूळ किंमत आहे 930 रुपये पण काळा बाजारात 1500 ते 2000 रुपये भावाने विकला जात आहे. याप्रकारबद्दल आता प्रशासनाने कारणेदाखवा नोटीसा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...