सुनील तटकरेंविरोधातील याचिका मागे

सुनील तटकरेंविरोधातील याचिका मागे

02 जुलैराज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य आहे. पण याचिकाकर्त्यांनी संबंधिक यंत्रणांकडे तक्रार करावी अशी सूचना हायकोर्टाने केलेली आहे. त्यामुळे राजेंद्र फणसे यांनी दाखल केलेली याचिका मागे घतेली. पण तक्रारीत तथ्य आहे असं मत हायकोर्टाने मोडल्यामुळे हा तटकरेंसाठी हायकोर्टाचा दणका आहे असं मानलं जातंय. तटकरे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने 140 कंपन्या सुरु केल्याचं उघडकीस आलंय. याप्रकरणी शुक्रवारी सुनिल तटकरे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता तटकरेंच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांमध्ये पैशांच्या अफरातफरी झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. यासदर्भात किरीट सोमय्या यांनी आज जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे नातलग आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली.

  • Share this:

02 जुलै

राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य आहे. पण याचिकाकर्त्यांनी संबंधिक यंत्रणांकडे तक्रार करावी अशी सूचना हायकोर्टाने केलेली आहे. त्यामुळे राजेंद्र फणसे यांनी दाखल केलेली याचिका मागे घतेली. पण तक्रारीत तथ्य आहे असं मत हायकोर्टाने मोडल्यामुळे हा तटकरेंसाठी हायकोर्टाचा दणका आहे असं मानलं जातंय. तटकरे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने 140 कंपन्या सुरु केल्याचं उघडकीस आलंय. याप्रकरणी शुक्रवारी सुनिल तटकरे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता तटकरेंच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांमध्ये पैशांच्या अफरातफरी झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. यासदर्भात किरीट सोमय्या यांनी आज जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे नातलग आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली.

First published: July 2, 2012, 11:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading