News18 Lokmat

पेट्रोलचे दर कमी करण्याच्या निर्णयावर वाद

26 नोव्हेंबरपेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी काल दिले. मात्र आता याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सहा राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवरा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच आरोप केलाय. निवडणूक आयोगानं मात्र देवरांना क्लीन चीट दिली आहे.लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील आणि असं आश्वासन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिलंय. मात्र विधानसभा निवडणूकांनतरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जातील असे संकेत त्यांनी दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी याचबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलंय. पेट्रोलच्या किंमती पाच रुपयांनी, सिलेंडरच्या वीस रुपयांनी कमी करणं शक्य असल्याचं या पत्रात म्हटलंय.विरोधकांनी मात्र देवरांच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊन अनेक दिवस झालेत. मग पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याची बुद्धी सरकारला आताच का सुचली असा प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.विरोधकांनी जरी आक्षेप घेतला असला तरी निवडणूक आयोगानं मुरली देवरांना क्लिन चीट दिली आहे. सगळ्या देशाचा हा प्रश्न असल्यानं सहा राज्यांच्या निवडणूकांचा इथं प्रश्नच येत नाही असंही आयोगानं स्पष्ट केलंय.या सर्व चर्चेनंतर, विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात हा मुद्दा उशिरा उपस्थित करण्यात आला की लोकसभा निवडणुका जवळ आल्याचे हे संकेत आहेत, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2008 05:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 05:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...