नवी मुंबईत 10 हॉस्पिटलचे परवाने रद्द

27 जूननवी मुंबईतील 10 हॉस्पिटलचेे परवाने महापालिकेनं रद्द केलेत. यामध्ये हिरानंदानी हॉस्पिटल, गुरुकूल हॉस्पिटल, लाईफ लाईन रुग्णालयाचा समावेश आहे. नवी मुंबई पालिका आरोग्य अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. बॉम्बे नर्सिंग कायद्‌यातील कलम 5 अन्वये ही कारवाई करण्यात आलीय. या रुग्णालय मध्ये नोंदणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं प्रमाण पत्र नसून अग्निशमन प्रतिबंधक उपायोजना नाहीत. तसेच या हॉस्पिटलमध्ये अतिरीक्त रुग्ण खाटा आढळून आल्यात. आरोग्य विभागानं नवी मुंबईत 175 नर्सिंग होम आणि रुग्णालयचं सर्वेक्षण केलं. 30 जूनपर्यंत या हॉस्पिटल्सनी संबंधीत प्रमाणपत्र आणि अटींची पुर्तता न केल्यास 1 जुलैला या हॉस्पिटलना टाळं ठोकण्यात येईल असंही अधिकार्‍यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2012 10:00 AM IST

नवी मुंबईत 10 हॉस्पिटलचे परवाने रद्द

27 जून

नवी मुंबईतील 10 हॉस्पिटलचेे परवाने महापालिकेनं रद्द केलेत. यामध्ये हिरानंदानी हॉस्पिटल, गुरुकूल हॉस्पिटल, लाईफ लाईन रुग्णालयाचा समावेश आहे. नवी मुंबई पालिका आरोग्य अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. बॉम्बे नर्सिंग कायद्‌यातील कलम 5 अन्वये ही कारवाई करण्यात आलीय. या रुग्णालय मध्ये नोंदणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं प्रमाण पत्र नसून अग्निशमन प्रतिबंधक उपायोजना नाहीत. तसेच या हॉस्पिटलमध्ये अतिरीक्त रुग्ण खाटा आढळून आल्यात. आरोग्य विभागानं नवी मुंबईत 175 नर्सिंग होम आणि रुग्णालयचं सर्वेक्षण केलं. 30 जूनपर्यंत या हॉस्पिटल्सनी संबंधीत प्रमाणपत्र आणि अटींची पुर्तता न केल्यास 1 जुलैला या हॉस्पिटलना टाळं ठोकण्यात येईल असंही अधिकार्‍यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...