मंत्रालयाच्या आगीत तिघांचा मृत्यू

मंत्रालयाच्या आगीत तिघांचा मृत्यू

21 जूनमंत्रालयालात लागलेल्या भीषण आगीत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासमोर तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख पटू शकली आहे. पण तिसर्‍या मृतदेहाची ओळखपटू शकली नाही. यापैकी दोघांची उमेश पोतेकर, महेश गुगळे अशी नावं आहे. हे दोघेही बारामती येथील रहिवासी आहे. उमेश पोतेकर हे बारामती बँकेचे माजी अध्यक्ष आहे तर गुगळे हे मर्चंट असोशियसनचे अध्यक्ष आहे. सहाव्या मजल्यावर अजूनही आग विझवण्याचे काम सुरु आहे. काही वेळापुर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी सहाव्या मजलावर दाखल झाले तेंव्हा या दोघांचे मृतदेह आढळले. मात्र,संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कोणतीच जीवीतहानी झाली नसल्याचा दावा केला होता मात्र तो साफ फोल ठरला आहे. विशेष म्हणजे पोतेकर आणि गुगळे हे अजितदादांचे चांगले निकटवर्तीय होते. दोघांनीही बारामतीला आपल्या मित्रपरिवारांना आम्हाला वाचवा आम्ही मंत्रालयात अडकलो आहोत असं विनंती केली होती. मात्र काही वेळानंतर फोन बंद झाल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. दोघांच्या मृत्यूमुळे बारामतीवर शोककळा पसरली आहे. राज्याच्या कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला आज आगडोंबात भस्म व्हावं लागलंय. आज गुरुवारी दुपारी 2:45 च्या सुमारास मंत्रालयात भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख मात्र पटू शकली नाही. चौथ्या मजल्यात नगरविकास खात्याच्या कार्यालयात पडलेली ठिणगी काही तासात 3 मजल्यासह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे दालन जळून खाक झाली. सहावा मजल्याची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अजून सुरु आहे. नेहमीसारखा मंत्रालयात दुपारचा लॅन्च टाईमचा वेळ फस्त केला जात होता. अचानक दुपारी 2 :45 च्या सुमारास मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या ऑफिसमध्ये स्फोटाचा आवाज झाला. काही वेळातच लाईट गेली. काही कळण्या अगोदरच कार्यालयात धूराने कार्यालय दाटून गेले. लागलेल्या या आगीनं थोड्याच वेळात भीषण स्वरूप घेतलं. आग चौथ्या मजल्यावर पसरू लागली. कर्मचारी सैरावैरा पळू लागली. अनेक जणं आतच अडकले. श्वास कोंडल्यानं ते खिडक्यांच्या दिशेनं धावले. तोवर अग्निशमन दलाचे बंब पोहोचले होते. आग लागल्यावर ते 20 मिनिटांनंतर पोहोचले आणि त्यांचं काम सुरू होण्यासाठी आणखी 20 मिनिटं लागली. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या तब्बल 30 इंजिन्सचे आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.तासाभरात आग पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर पोहोचली. काही लक्षात येण्याच्या आत सहाव्या मजल्यावर असलेलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ऑफिसही जळून खाक झालं. एव्हान.. मंत्रालयातल्या तीन हजार लोकांना बाहेर काढण्यात आलं.आगीत 16 जण जखमी झाले असून 13 जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे तर 3 जण हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आगीची गुन्हे शाखा चौकशी करणार आणि उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याचं जाहीर केलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत आग हळहळू आटोक्यात आली. आगीत कोणताही जीवितहानी झाली नाही. पण राज्यातल्या या अतिमहत्त्वाच्या इमारतीला लागलेल्या आगीमुळे राज्यातली आपत्कालीन यंत्रणा किती दुर्बळ आहे, हे दिसून आलं.

  • Share this:

21 जून

मंत्रालयालात लागलेल्या भीषण आगीत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासमोर तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख पटू शकली आहे. पण तिसर्‍या मृतदेहाची ओळखपटू शकली नाही. यापैकी दोघांची उमेश पोतेकर, महेश गुगळे अशी नावं आहे. हे दोघेही बारामती येथील रहिवासी आहे. उमेश पोतेकर हे बारामती बँकेचे माजी अध्यक्ष आहे तर गुगळे हे मर्चंट असोशियसनचे अध्यक्ष आहे. सहाव्या मजल्यावर अजूनही आग विझवण्याचे काम सुरु आहे. काही वेळापुर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी सहाव्या मजलावर दाखल झाले तेंव्हा या दोघांचे मृतदेह आढळले. मात्र,संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कोणतीच जीवीतहानी झाली नसल्याचा दावा केला होता मात्र तो साफ फोल ठरला आहे. विशेष म्हणजे पोतेकर आणि गुगळे हे अजितदादांचे चांगले निकटवर्तीय होते. दोघांनीही बारामतीला आपल्या मित्रपरिवारांना आम्हाला वाचवा आम्ही मंत्रालयात अडकलो आहोत असं विनंती केली होती. मात्र काही वेळानंतर फोन बंद झाल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. दोघांच्या मृत्यूमुळे बारामतीवर शोककळा पसरली आहे.

राज्याच्या कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला आज आगडोंबात भस्म व्हावं लागलंय. आज गुरुवारी दुपारी 2:45 च्या सुमारास मंत्रालयात भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख मात्र पटू शकली नाही. चौथ्या मजल्यात नगरविकास खात्याच्या कार्यालयात पडलेली ठिणगी काही तासात 3 मजल्यासह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे दालन जळून खाक झाली. सहावा मजल्याची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अजून सुरु आहे.

नेहमीसारखा मंत्रालयात दुपारचा लॅन्च टाईमचा वेळ फस्त केला जात होता. अचानक दुपारी 2 :45 च्या सुमारास मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या ऑफिसमध्ये स्फोटाचा आवाज झाला. काही वेळातच लाईट गेली. काही कळण्या अगोदरच कार्यालयात धूराने कार्यालय दाटून गेले. लागलेल्या या आगीनं थोड्याच वेळात भीषण स्वरूप घेतलं. आग चौथ्या मजल्यावर पसरू लागली. कर्मचारी सैरावैरा पळू लागली. अनेक जणं आतच अडकले. श्वास कोंडल्यानं ते खिडक्यांच्या दिशेनं धावले. तोवर अग्निशमन दलाचे बंब पोहोचले होते. आग लागल्यावर ते 20 मिनिटांनंतर पोहोचले आणि त्यांचं काम सुरू होण्यासाठी आणखी 20 मिनिटं लागली. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या तब्बल 30 इंजिन्सचे आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.तासाभरात आग पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर पोहोचली. काही लक्षात येण्याच्या आत सहाव्या मजल्यावर असलेलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ऑफिसही जळून खाक झालं. एव्हान.. मंत्रालयातल्या तीन हजार लोकांना बाहेर काढण्यात आलं.आगीत 16 जण जखमी झाले असून 13 जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे तर 3 जण हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आगीची गुन्हे शाखा चौकशी करणार आणि उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याचं जाहीर केलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत आग हळहळू आटोक्यात आली. आगीत कोणताही जीवितहानी झाली नाही. पण राज्यातल्या या अतिमहत्त्वाच्या इमारतीला लागलेल्या आगीमुळे राज्यातली आपत्कालीन यंत्रणा किती दुर्बळ आहे, हे दिसून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2012 05:09 PM IST

ताज्या बातम्या