आगीची क्राईम ब्रँच चौकशी होणार - मुख्यमंत्री

आगीची क्राईम ब्रँच चौकशी होणार - मुख्यमंत्री

21 जूनमंत्रालयात लागलेल्या आगीत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. 16 जण जखमी झाले त्यापैकी 13 जणांना वैद्यकीय उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर तिघं जण हॉस्पिटलमध्ये दाखलं आहे. आगीवर संपूर्ण नियंत्रण आले आहे. या आगीत चार मजले जळून खाक झाले आहेत याबद्दल गुन्हे शाखा चौकशी करणार आणि उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी आपात्कालीन बैठक घेतल्यानंतर पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. आज दुपारी 2:45 ला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरुप इतके भीषण होते की आगीच्या विळाख्यात मंत्रालयाची तीन मजले जळून खाक झालेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी तातडीने हजर राहुन जबाबदारीने काम पार पाडले. दुपारी आग लागली तेंव्हा अडीच ते तीन हजार कर्मचारी काम करत होते तर त्यांना भेटायला येणार्‍यांची संख्याही तितकीच होती. पण सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. उद्यापासून मंत्रालयाचा कारभार सुरु होईल. यासाठी नियोजित कार्यालयात सगळे मंत्री आणि त्यांचे अधिकारी पर्यायी जागांवर आपलं काम सुरू करतील. सह्याद्री भवन,विस्तार भवन आदी ठिकाणी काम सुरु राहील पण नियोजित सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला सोमवारी फायर बील घेतलं जात त्यामुळे कोणताही बळी गेला नाही. या आगीत भस्मसात झालेल्या सामानाचं स्ट्रकचरल ऑडिट केलं जाईल तसेच नगर विकास मंत्रालयाच्या सर्व फाईल्स स्कॅन आहेत. 3 कोटी 50 लाख कागदांच स्कॅनींग करण्यात आलं होते आणि बॅकपही घेण्यात आले त्यामुळे खात्यातील सगळे कागदपत्रे सुरक्षित आहे. उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

21 जून

मंत्रालयात लागलेल्या आगीत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. 16 जण जखमी झाले त्यापैकी 13 जणांना वैद्यकीय उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर तिघं जण हॉस्पिटलमध्ये दाखलं आहे. आगीवर संपूर्ण नियंत्रण आले आहे. या आगीत चार मजले जळून खाक झाले आहेत याबद्दल गुन्हे शाखा चौकशी करणार आणि उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी आपात्कालीन बैठक घेतल्यानंतर पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

आज दुपारी 2:45 ला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरुप इतके भीषण होते की आगीच्या विळाख्यात मंत्रालयाची तीन मजले जळून खाक झालेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी तातडीने हजर राहुन जबाबदारीने काम पार पाडले. दुपारी आग लागली तेंव्हा अडीच ते तीन हजार कर्मचारी काम करत होते तर त्यांना भेटायला येणार्‍यांची संख्याही तितकीच होती. पण सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

उद्यापासून मंत्रालयाचा कारभार सुरु होईल. यासाठी नियोजित कार्यालयात सगळे मंत्री आणि त्यांचे अधिकारी पर्यायी जागांवर आपलं काम सुरू करतील. सह्याद्री भवन,विस्तार भवन आदी ठिकाणी काम सुरु राहील पण नियोजित सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दर आठवड्याला सोमवारी फायर बील घेतलं जात त्यामुळे कोणताही बळी गेला नाही. या आगीत भस्मसात झालेल्या सामानाचं स्ट्रकचरल ऑडिट केलं जाईल तसेच नगर विकास मंत्रालयाच्या सर्व फाईल्स स्कॅन आहेत. 3 कोटी 50 लाख कागदांच स्कॅनींग करण्यात आलं होते आणि बॅकपही घेण्यात आले त्यामुळे खात्यातील सगळे कागदपत्रे सुरक्षित आहे. उद्या सर्व इमारतीचं व्हिडिओग्राफी होणार असून स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

First published: June 21, 2012, 3:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading