News18 Lokmat

टाटा टीनं दिला जागो रेचा नारा

25 नोव्हेंबर मुंबईसमीर सावंतटाटा टीनं आता फुटबॉलमध्येही जागो रेचा नारा दिला आहे. फुटबॉलमध्ये ते आता भारतातून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणार आहेत. आर्सेनल फुटबॉल क्लब हा इंग्लंडमधला एक नामांकित फुटबॉल क्लब. याच क्लबच्या सहकार्यानं लवकरच भारतातही फुटबॉलची धूम सुरू होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेचं नाव आहे. जागो रे सॉकर स्टार्स 2009. भारतीय फुटबॉल टिमचा कॅप्टन बायचुंग भुतीयाने या स्पर्धेची घोषणा केली. देशभरातल्या 10 शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला कालिकतमध्ये पहिली मॅच खेळवली जाणार आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक शहरातून एकेक टीम निवडली जाणार आहे. अशा 20 टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. साखळी पद्धतीनं खेळवण्यात येणा-या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे एक नॅशनल टीम. यातल्याच सर्वोतम 30 मुलांना आर्सेनल क्लबच्या कोचकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्यावर्षी निवड झालेल्या टीममधल्या मुलांनी इंग्लंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. आर्सेनल सॉकर फेस्टिवलमध्ये त्यांनी प्लेट कप जिंकत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारी भारताची ती पहिली टीम होती.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 25, 2008 08:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...