Elec-widget

हा कसला विरोधी पक्ष ?- राज

हा कसला विरोधी पक्ष ?- राज

20 जूनराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणारा हा कोणता विरोधी पक्ष ? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे जाहीर पाठिंबा द्याचा याला काय म्हणायचं ? हा कोणता विरोधी पक्ष यांच्यात काहीतरी साटंलोटं असल्याची खरमरीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. असल्या पक्षापासून आपण चारहात दूर राहिलेलं बरं पण कोणत्याही विरोधी पक्षाला न शोभणारा पराक्रम यांनी करुन दाखवला आहे असा टोलाही राज यांनी लगावला. जेष्ठ पत्रकार निलकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काल मंगळवारी शिवसेनेनं प्रणव मुखर्जी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आमचा प्रणवदांना पाठिंबा आहे काँग्रेसला नाही असा खुलासाही शिवसेनेनं केला. शिवसेनेच्या या भुमिकेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. महापालिकेच्या निवडणुकीत की पृथ्वीराज चव्हाण यांची शिवसेनेवर टीका करुन शिवसैनिकांना पेटवले. परिणामी सेनेचा विजय झाला.काँग्रेसचे नेते अहमद पटेल नेहमी मुंबईत येत जात- राहतात यांच्या पाटर्‌या कुठे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात हे मला चांगलं ठाऊक आहे. मी लहान असताना बाळासाहेबांसोबत फिरलो, राजकीय सभा पाहिल्यात त्यांच्या शिवसेनेत मी लहानाचा मोठा झालो पण बाळासाहेबांचे त्यावेळेसचे राजकारण वेगळे होते आणि आताचे राजकारण वेगळे आहे. काँग्रेसला नेहमी आरोपीच्या पिंजर्‍या उभे करणार्‍या या पक्षांने प्रणवदांना कसा काय पाठिंबा दिला. प्रणवदांना पाठिंबा देणार हा कसला विरोधी पक्ष ? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेत जे शिकायला मिळाले त्याबळावर आज मी इतका मोठा झालो आहे. मनसे राजकीय पटलावर आले तेंव्हा कित्येक जणांनी हा टिकणार की नाही असा तर्क लढवला होता. पण 12 आमदार आणि नाशिक महापालिकेत पहिला महापौर, पुणे पालिकेत विरोधी पक्ष नेता इथं पर्यंत मी मजल मारली आहे. येणार्‍या 2014 च्या निवडणुकीत चांगला चमत्कार घडवू असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

  • Share this:

20 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणारा हा कोणता विरोधी पक्ष ? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे जाहीर पाठिंबा द्याचा याला काय म्हणायचं ? हा कोणता विरोधी पक्ष यांच्यात काहीतरी साटंलोटं असल्याची खरमरीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. असल्या पक्षापासून आपण चारहात दूर राहिलेलं बरं पण कोणत्याही विरोधी पक्षाला न शोभणारा पराक्रम यांनी करुन दाखवला आहे असा टोलाही राज यांनी लगावला. जेष्ठ पत्रकार निलकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काल मंगळवारी शिवसेनेनं प्रणव मुखर्जी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आमचा प्रणवदांना पाठिंबा आहे काँग्रेसला नाही असा खुलासाही शिवसेनेनं केला. शिवसेनेच्या या भुमिकेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. महापालिकेच्या निवडणुकीत की पृथ्वीराज चव्हाण यांची शिवसेनेवर टीका करुन शिवसैनिकांना पेटवले. परिणामी सेनेचा विजय झाला.काँग्रेसचे नेते अहमद पटेल नेहमी मुंबईत येत जात- राहतात यांच्या पाटर्‌या कुठे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात हे मला चांगलं ठाऊक आहे.

मी लहान असताना बाळासाहेबांसोबत फिरलो, राजकीय सभा पाहिल्यात त्यांच्या शिवसेनेत मी लहानाचा मोठा झालो पण बाळासाहेबांचे त्यावेळेसचे राजकारण वेगळे होते आणि आताचे राजकारण वेगळे आहे. काँग्रेसला नेहमी आरोपीच्या पिंजर्‍या उभे करणार्‍या या पक्षांने प्रणवदांना कसा काय पाठिंबा दिला. प्रणवदांना पाठिंबा देणार हा कसला विरोधी पक्ष ? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेत जे शिकायला मिळाले त्याबळावर आज मी इतका मोठा झालो आहे. मनसे राजकीय पटलावर आले तेंव्हा कित्येक जणांनी हा टिकणार की नाही असा तर्क लढवला होता. पण 12 आमदार आणि नाशिक महापालिकेत पहिला महापौर, पुणे पालिकेत विरोधी पक्ष नेता इथं पर्यंत मी मजल मारली आहे. येणार्‍या 2014 च्या निवडणुकीत चांगला चमत्कार घडवू असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2012 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...