ठाण्यात सरकारी डॉक्टराचे गर्भपात सेंटर सील

ठाण्यात सरकारी डॉक्टराचे गर्भपात सेंटर सील

19 जूनठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे राजकारण सिंग या सरकारी डॉक्टरांच्या गर्भपात सेंटरला सील करण्यात आलंय. कायद्याने गुन्हा असलेल्या 20 आठवड्याच्या गर्भाचे गर्भपात या केंद्रावर केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अंबरनाथ तालुक्यातील 23 गर्भपात सेंटरवर छापे टाकण्यात आलेत. यात 6 सेंटर सील करण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये अंबरनाथ शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीचेही गर्भपात सेंटरही सील करण्यात आलंय. गर्भनिदान करुन स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांनी पथक तयार करुन सोनाग्राफी सेंटरवर छापे मारले आहे. या छाप्यामध्ये या अवैध गर्भपात सेंटरची मान्यता कायमची रद्द करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली होती.

  • Share this:

19 जून

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे राजकारण सिंग या सरकारी डॉक्टरांच्या गर्भपात सेंटरला सील करण्यात आलंय. कायद्याने गुन्हा असलेल्या 20 आठवड्याच्या गर्भाचे गर्भपात या केंद्रावर केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अंबरनाथ तालुक्यातील 23 गर्भपात सेंटरवर छापे टाकण्यात आलेत. यात 6 सेंटर सील करण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये अंबरनाथ शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीचेही गर्भपात सेंटरही सील करण्यात आलंय. गर्भनिदान करुन स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांनी पथक तयार करुन सोनाग्राफी सेंटरवर छापे मारले आहे. या छाप्यामध्ये या अवैध गर्भपात सेंटरची मान्यता कायमची रद्द करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली होती.

First published: June 19, 2012, 7:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading