कोयनेच्या वन क्षेत्रातील 14 गावांना वगळण्याला मान्यता

कोयनेच्या वन क्षेत्रातील 14 गावांना वगळण्याला मान्यता

14 जूनकोयना अभयारण्यातील खासगी वन क्षेत्रातील 14 गावांना वगळण्याच्या राज्य शासनाच्या शिफारशीला केंद्रानं मान्यता दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवी दिल्लीला केंद्रीय वन्य जीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 28 जून 2011 पासून कोयना अभयारण्यातील 14 गावे वगळण्याचा निर्णय प्रलंबित होता. नुकत्याच झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर केंद्राकडे ही गावं वगळण्याची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. 423 चौरस किमी च्या कोयना अभयारण्यापैकी 99.5 चौ.किमी खासगी वन्य जागेतील ही गावं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 पैकी काही गावं ही यापुर्वीच पुनर्वसित झाली आहेत व ती खासगी क्षेत्रात येतात. त्यामुळे ही गावं वगळण्यास केंद्रानं हिरवा कंदील दिला. मात्र सोबतच या बैठकीत जे क्षेत्र कमी होईल त्या मोबदल्यात नवीन वनक्षेत्र विकसीत करावे अशी अट टाकण्यात आली. याच बैठकीत राज्य शासनानं नुकतेच पाच अभयारण्य घोषित केले आहेत.

  • Share this:

14 जून

कोयना अभयारण्यातील खासगी वन क्षेत्रातील 14 गावांना वगळण्याच्या राज्य शासनाच्या शिफारशीला केंद्रानं मान्यता दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवी दिल्लीला केंद्रीय वन्य जीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 28 जून 2011 पासून कोयना अभयारण्यातील 14 गावे वगळण्याचा निर्णय प्रलंबित होता.

नुकत्याच झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर केंद्राकडे ही गावं वगळण्याची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. 423 चौरस किमी च्या कोयना अभयारण्यापैकी 99.5 चौ.किमी खासगी वन्य जागेतील ही गावं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 पैकी काही गावं ही यापुर्वीच पुनर्वसित झाली आहेत व ती खासगी क्षेत्रात येतात. त्यामुळे ही गावं वगळण्यास केंद्रानं हिरवा कंदील दिला. मात्र सोबतच या बैठकीत जे क्षेत्र कमी होईल त्या मोबदल्यात नवीन वनक्षेत्र विकसीत करावे अशी अट टाकण्यात आली. याच बैठकीत राज्य शासनानं नुकतेच पाच अभयारण्य घोषित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2012 02:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading