अण्णांचा दौरा संपला ; 'लोकायुक्त'कडे सरकारची पाठ

अण्णांचा दौरा संपला ; 'लोकायुक्त'कडे सरकारची पाठ

07 जूनराज्यात सक्षम लोकायुक्त आणावा, यासाठी अण्णा हजारे यांनी गेला महिनाभर राज्याच्या दौरा केला. शिर्डीपासून सुरू झालेला हा दौरा आज ठाण्यात संपला. पण ज्या सक्षम लोकायुक्तासाठी अण्णांनी आंदोलन केलं त्या लोकायुक्ताच्या मागणीला मात्र राज्यसरकारनं केराची टोपली दाखवली.लोकपालच्या मुद्द्यावरून दिल्ली हादरवलेल्या अण्णांनी.. सक्षम लोकायुक्तासाठी महाराष्ट्रात रणशिंग फुंकलं. जनजागृती करण्यासाठी अण्णा राज्याच्या दौर्‍यावर निघाले. सुरुवात केली ती शिर्डीत साईबांबाच्या दर्शनाने. इथल्या पहिल्या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण याच सभेच्या आयोजनात भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेली सक्रीयता अण्णांसाठी अडचणीची ठरली.शिर्डीतून अण्णा मराठवाड्यात गेले. त्यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला. औरंगाबादेत सोडला, तर उरलेल्या जिल्ह्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर आणि उस्मानाबादेत तर लोकायुक्त कायद्याची माहिती देणार्‍या तब्बल 20 हजार पुस्तकांची विक्री झाली.अण्णा मराठवाड्यातून विदर्भात गेले. 46 अंश तापमान असतानाही त्यांनी सर्व जिल्ह्यांचा दौरा केला. आगदी नक्षलवाद प्रभावित गडचिरोलीतही त्यांनी हजेरी लावली. पण याच वेळी नागपूरमध्ये त्यांच्या ताफ्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विदर्भानंतर अण्णांनी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्रात येताच अण्णांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठवला. सहकार खात्याच्या श्वेतपत्रिकेची मागणी केली. अण्णा महाराष्ट्र दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात कोकणात आले. पण मुंबई-ठाण्यातल्या त्यांच्या सभांना फारसा पाठिंबा मिळाला नाही. नवी मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी त्याचंी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सशक्त लोकायुक्तासाठी 73 वर्षांच्या अण्णांनी तळपत्या उन्हात.. महाराष्ट्र पालथा घातला...पण हा त्यांचा संघर्ष सरकारवर दबाव आणू शकेल का हाच खरा प्रश्न आहे.

  • Share this:

07 जून

राज्यात सक्षम लोकायुक्त आणावा, यासाठी अण्णा हजारे यांनी गेला महिनाभर राज्याच्या दौरा केला. शिर्डीपासून सुरू झालेला हा दौरा आज ठाण्यात संपला. पण ज्या सक्षम लोकायुक्तासाठी अण्णांनी आंदोलन केलं त्या लोकायुक्ताच्या मागणीला मात्र राज्यसरकारनं केराची टोपली दाखवली.

लोकपालच्या मुद्द्यावरून दिल्ली हादरवलेल्या अण्णांनी.. सक्षम लोकायुक्तासाठी महाराष्ट्रात रणशिंग फुंकलं. जनजागृती करण्यासाठी अण्णा राज्याच्या दौर्‍यावर निघाले. सुरुवात केली ती शिर्डीत साईबांबाच्या दर्शनाने. इथल्या पहिल्या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण याच सभेच्या आयोजनात भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेली सक्रीयता अण्णांसाठी अडचणीची ठरली.शिर्डीतून अण्णा मराठवाड्यात गेले. त्यांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला. औरंगाबादेत सोडला, तर उरलेल्या जिल्ह्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर आणि उस्मानाबादेत तर लोकायुक्त कायद्याची माहिती देणार्‍या तब्बल 20 हजार पुस्तकांची विक्री झाली.

अण्णा मराठवाड्यातून विदर्भात गेले. 46 अंश तापमान असतानाही त्यांनी सर्व जिल्ह्यांचा दौरा केला. आगदी नक्षलवाद प्रभावित गडचिरोलीतही त्यांनी हजेरी लावली. पण याच वेळी नागपूरमध्ये त्यांच्या ताफ्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विदर्भानंतर अण्णांनी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्रात येताच अण्णांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठवला. सहकार खात्याच्या श्वेतपत्रिकेची मागणी केली.

अण्णा महाराष्ट्र दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात कोकणात आले. पण मुंबई-ठाण्यातल्या त्यांच्या सभांना फारसा पाठिंबा मिळाला नाही. नवी मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी त्याचंी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सशक्त लोकायुक्तासाठी 73 वर्षांच्या अण्णांनी तळपत्या उन्हात.. महाराष्ट्र पालथा घातला...पण हा त्यांचा संघर्ष सरकारवर दबाव आणू शकेल का हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading