तटकरेंच्या 'कारभाराची' न्यायमुर्तीकडून चौकशी व्हावी - तावडे

तटकरेंच्या 'कारभाराची' न्यायमुर्तीकडून चौकशी व्हावी - तावडे

06 जूनजलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कुंटुंबीयांच्या नावे अनेक कंपन्या असल्याचा भांडाफोड आयबीएन लोकमतने केल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहे. तटकरे यांनी त्यांच्या सुपुत्राची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची थेट उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीकडून चौकशी व्हावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे. तटकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मुलगा, मुलगी, सून यांच्यासह काही निकटवर्तीयांना तब्बल 140 कंपन्या उघडून दिल्या. इतकंच नाही तर त्यासाठी आठशे एकर जागा विकत घेतली असा गंभीर आरोप होत आहे. काल तटकरे यांनी आयबीएन लोकमतवर या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही कंपन्या मुलाच्या नावावर आहे काही कंपन्यातून तो निवृत्त झाला आहे. फार फार 14 ते 15 कंपन्या मुलाच्या नावावर असल्याची कबुली तटकरे यांनी दिली. तसेच 100 कंपन्याचा आरोप चुकीचा आहे रायगडामध्ये इतक्या दिवसांपासून राजकारणात, समाजकारणात असल्यामुळे असे खोटे आरोप आपल्यावर होत असल्याचं तटकरे यांचं म्हणणं आहे. हा सगळा कारभार मुलाचा आहे तो त्याचा स्वतंत्र्य निर्णय घेतो त्यांच्या कारभारात आपला सहभाग नसल्याचं सांगत तटकरे यांनी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:चा मुलगा जो नेहमी आपल्या सोबत राहतो, तो 800 एकर जमीन, 140 कंपन्या उघडतो पण सुनील तटकरे यांना याबद्दल काहीच माहित नाही. यावर जनतेनी कसा विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.

  • Share this:

06 जून

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कुंटुंबीयांच्या नावे अनेक कंपन्या असल्याचा भांडाफोड आयबीएन लोकमतने केल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहे. तटकरे यांनी त्यांच्या सुपुत्राची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची थेट उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीकडून चौकशी व्हावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे.

तटकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मुलगा, मुलगी, सून यांच्यासह काही निकटवर्तीयांना तब्बल 140 कंपन्या उघडून दिल्या. इतकंच नाही तर त्यासाठी आठशे एकर जागा विकत घेतली असा गंभीर आरोप होत आहे. काल तटकरे यांनी आयबीएन लोकमतवर या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही कंपन्या मुलाच्या नावावर आहे काही कंपन्यातून तो निवृत्त झाला आहे. फार फार 14 ते 15 कंपन्या मुलाच्या नावावर असल्याची कबुली तटकरे यांनी दिली. तसेच 100 कंपन्याचा आरोप चुकीचा आहे रायगडामध्ये इतक्या दिवसांपासून राजकारणात, समाजकारणात असल्यामुळे असे खोटे आरोप आपल्यावर होत असल्याचं तटकरे यांचं म्हणणं आहे. हा सगळा कारभार मुलाचा आहे तो त्याचा स्वतंत्र्य निर्णय घेतो त्यांच्या कारभारात आपला सहभाग नसल्याचं सांगत तटकरे यांनी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:चा मुलगा जो नेहमी आपल्या सोबत राहतो, तो 800 एकर जमीन, 140 कंपन्या उघडतो पण सुनील तटकरे यांना याबद्दल काहीच माहित नाही. यावर जनतेनी कसा विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.

First published: June 6, 2012, 4:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading