वर्‍हाडाच्या बसला अपघात, 28 जण ठार

वर्‍हाडाच्या बसला अपघात, 28 जण ठार

28 मेमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ वर्‍हाडाच्या बसला काल रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुरुस्तीसाठी थांबलेल्या बसला टेम्पोनं धडक दिली. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहे. हे सर्व प्रवासी येरवडा येथील रहिवासी आहेत. लिलालाबाई बहुले यांचा मुलगा एकनाथ बहुले याचा घाटकोपरच्या मनिषा गायकवाड सोबत लग्न होतं. लग्न आटपून वर्‍हाड बसने पुण्याला रवाना झाल होते. यासाठी त्यांनी तीन मिनी बस केल्या होत्या. खालापूर टोल नाक्याजवळ पहिली बस पोहचली असता तिचे टायर पंक्चर झाले. पंक्चर काढण्यासाठी बस थांबली. या पाठोपाठ दुसरी बसही त्या ठिकाणी पोहचली. बसच्या प्रकाशझोतात पंक्चर काढत असतांना बसमधील प्रवासी गाडीखाली उतरले होते. दुदैर्वाने याच वेळी एक मालवाहतूक टेम्पो भरधाव वेगात बसवर धडकला. या धडकेमुळे बसखाली प्रवाशी चिरडले गेले. सुदैवाने नवदाम्पत्य मारुती गाडीने पुढे निघाले होते त्यामुळे ते वाचले. पण बसने येत असल्यांचा अपघातात मृत्यू झाला. जखमींना पनवेलच्या एमजीएम,अष्टविनायक हॉस्पिटल आणि पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

28 मे

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ वर्‍हाडाच्या बसला काल रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुरुस्तीसाठी थांबलेल्या बसला टेम्पोनं धडक दिली. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहे. हे सर्व प्रवासी येरवडा येथील रहिवासी आहेत. लिलालाबाई बहुले यांचा मुलगा एकनाथ बहुले याचा घाटकोपरच्या मनिषा गायकवाड सोबत लग्न होतं. लग्न आटपून वर्‍हाड बसने पुण्याला रवाना झाल होते. यासाठी त्यांनी तीन मिनी बस केल्या होत्या. खालापूर टोल नाक्याजवळ पहिली बस पोहचली असता तिचे टायर पंक्चर झाले. पंक्चर काढण्यासाठी बस थांबली. या पाठोपाठ दुसरी बसही त्या ठिकाणी पोहचली. बसच्या प्रकाशझोतात पंक्चर काढत असतांना बसमधील प्रवासी गाडीखाली उतरले होते. दुदैर्वाने याच वेळी एक मालवाहतूक टेम्पो भरधाव वेगात बसवर धडकला. या धडकेमुळे बसखाली प्रवाशी चिरडले गेले. सुदैवाने नवदाम्पत्य मारुती गाडीने पुढे निघाले होते त्यामुळे ते वाचले. पण बसने येत असल्यांचा अपघातात मृत्यू झाला. जखमींना पनवेलच्या एमजीएम,अष्टविनायक हॉस्पिटल आणि पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 09:44 AM IST

ताज्या बातम्या