अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात

अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात

16 मेअंबरनाथ नगरपालिकेत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर अंबरनाथ पॅटर्न अस्तित्वात आला होता. पण आता मनसेनं शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये आता मनसे पॅटर्न संपुष्टात आला आहे. सेनेला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणार्‍या मनसेच्या 6 नगरसेवकांनी आघाडीला सभापती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आघाडीचे 26 तर युतीचे आणि अपक्ष मिळून असे 24 नगरसेवक हे पक्षीय बलाबल आहे. यातही सेनेचा पंढरीनाथ वारीगे हा नगरसेवक ठाण्यातील तुरूंगात आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये सेनेने 17 वर्ष राखलेली सत्ता आता संपणार आहे.

  • Share this:

16 मे

अंबरनाथ नगरपालिकेत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर अंबरनाथ पॅटर्न अस्तित्वात आला होता. पण आता मनसेनं शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये आता मनसे पॅटर्न संपुष्टात आला आहे. सेनेला विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणार्‍या मनसेच्या 6 नगरसेवकांनी आघाडीला सभापती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आघाडीचे 26 तर युतीचे आणि अपक्ष मिळून असे 24 नगरसेवक हे पक्षीय बलाबल आहे. यातही सेनेचा पंढरीनाथ वारीगे हा नगरसेवक ठाण्यातील तुरूंगात आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये सेनेने 17 वर्ष राखलेली सत्ता आता संपणार आहे.

First published: May 16, 2012, 5:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading