मद्यधुंद चालक स्कॉर्पियो घेऊन थेट रेल्वे ट्रॅकवर, मालगाडीने दिली धडक

मद्यधुंद चालक स्कॉर्पियो घेऊन थेट रेल्वे ट्रॅकवर, मालगाडीने दिली धडक

फाटक बंद असल्यानं त्यानं फाटकाला धडक दिली आणि फाटक तोडून गाडी रेल्वे रुळावर घातली.

  • Share this:

डोंबिवली, 21 मार्च : मद्यधुंद स्कॉर्पियो चालकानं बंद रेल्वेगेट तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर प्रवेश केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीनं कारला धडक दिल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. यात सुदैवानं चालकाचा जीव वाचला आहे.

डोंबिवलीच्या मोठागाव रेल्वे फाटकात ही घटना घडली. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी चालवत असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत मोठागाव फाटकाजवळ आला. मात्र फाटक बंद असल्यानं त्यानं फाटकाला धडक दिली आणि फाटक तोडून गाडी रेल्वे रुळावर घातली. त्याचवेळी या मार्गावरून एक भरधाव मालगाडी आली आणि तिने स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली.

या धडकेत गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं चालकाला जास्त इजा झालेली नाही. त्याच्यावर सध्या डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाविरोधात कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

SPECIAL REPORT : माढ्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन B'!

First published: March 21, 2019, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading