नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करुन तरुणीची हत्या

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करुन तरुणीची हत्या

11 मेनवी मुंबईत मॉलमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून दोन तरुणींवर बलात्कार करुन हत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाशी रेल्वेस्थानकासमोरील झोपडपट्टीत राहणार्‍या या दोघी तरुणी कचरा वेचणाचं काम करत होत्या. या दोघींना दोन अज्ञात व्यक्तींनी मॉलमध्ये नोकरी देतो म्हणून सीबीडी उड्डाणपुलाखाली आणले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर या नराधमांनी या तरुणींवर धारदार शस्त्राने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीचा जागीच मृत्यू झाला. दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सीबीडी पोलिसांच्या बीट मार्शल पथकाला ही जखमी महिला आढळली. सध्या तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात बलात्कार करुन खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

  • Share this:

11 मे

नवी मुंबईत मॉलमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून दोन तरुणींवर बलात्कार करुन हत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाशी रेल्वेस्थानकासमोरील झोपडपट्टीत राहणार्‍या या दोघी तरुणी कचरा वेचणाचं काम करत होत्या. या दोघींना दोन अज्ञात व्यक्तींनी मॉलमध्ये नोकरी देतो म्हणून सीबीडी उड्डाणपुलाखाली आणले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर या नराधमांनी या तरुणींवर धारदार शस्त्राने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीचा जागीच मृत्यू झाला. दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सीबीडी पोलिसांच्या बीट मार्शल पथकाला ही जखमी महिला आढळली. सध्या तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात बलात्कार करुन खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

First published: May 11, 2012, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading