एक 'ह्रदय'स्पर्श कहाणी !

एक 'ह्रदय'स्पर्श कहाणी !

05 मे'काकस्पर्श' हा उषा दातार यांनी चारपानी कथा लिहिली होती, त्याच कथेवर आधारित हा सिनेमा, दिग्दर्शक महेश मांजरेकर.. काळ 1930 ते 1945 दरम्यानचा काळ, त्याकाळातलं कोकणातलं एक कुटुंब, कोकणातलं घर, त्याकाळातली माणसं, धार्मिक रुढी-परंपरा, आसपास कर्मठ वातावरण, नीती-अनीतीच्या कल्पना, नाती-ऋणानुबंध, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे हरप्रकारे सुरु असलेले प्रयत्न आणि याच काळातली एक विलक्षण प्रेमकहाणी... कथेबद्दल सांगायचं तर एवढंच सांगता येईल.. खरंतर प्रेम आणि त्यागाची कहाणी असंही म्हणता येईल. दिग्दर्शक महेश मांजरेकर, कथा ऐकल्यावर एकदम भारावूनच गेले आणि त्यांनी चंगच बांधला की यावर आपणच सिनेमा करायचा. हे सगळं आतापर्यंत तुम्ही मुलाखतींमध्ये ऐकलेलं आहेच, पण ते इथे पुन्हा सांगायचं कारण याच विषयावर सिनेमा बनवण्यासाठीचं एका दिग्दर्शकाचं झपाटलेपण सिनेमा बघताना जाणवत राहतं. खरंतर काकस्पर्श या नावावरुन आणि सिनेमाच्या लूकवरुन हा सिनेमा जुन्या काळातला आहे हे तर कळतं पण त्याचबरोबर प्रोमोमधून विषय गंभीर आहे हेसुध्दा लक्षात येतं. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि लालबाग परळ या सिनेमांमध्येसुध्दा काहीतरी मिसिंग होतं, पण ते महेश मांजरेकर यांना सापडलं काकस्पर्शमध्ये असं नक्कीच म्हणता येईल. जबरदस्त कथा, मग पटकथेवर केलेले उत्तम संस्कार, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची मेहनत यामुळे सुंदर सिनेमा कसा बनतो याचं आजच्या काळातलं उदाहरण आहे काकस्पर्श. एकतर जुना काळ दाखवायचा याचं तांत्रिक आव्हान त्यांच्यापुढे होतंच पण त्याचबरोबर कलाकारांची निवड, त्यांचा लूक याही गोष्टी होत्याच..गारंबीचा बापू सारख्या सिनेमातून, श्रीना पेंडसे, गोनी दांडेकरांच्या पुस्तकांमधून, 'कुछ खोया कुछ पाया' या पडघवली पुस्तकावर आधारित हिंदी मालिकेत आपल्याला हेच अस्सल कोकणी कर्मठ, सनातनी वातावरण दिसलेलं आहे, तोच काळ पुन्हा एकदा काकस्पर्शमधून उभा करण्यात आलाय, त्यात या सिनेमाची कथा काल्पनिक असल्यामुळे संशोधन झालंय ते त्या काळावर... फक्त घरच नाही घरामागची विहीर, नारळ-सुपारीची बाग, मंदिर हे सगळं जसंच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न खूपच यशस्वी झालेला आहे. दिग्दर्शक जसा कथेच्या प्रेमात पडला तसाच सिनेमा बघितल्यावर प्रेक्षकही कथेनं भारावून गेलेला असतो.याशिवाय दिग्दर्शकाला अतिशय चांगली साथ मिळालीये ती कलाकारांची.. मेधा मांजरेकर यांची घरातली कर्ती सवरती बाई, स्वातंत्र्यसैनिक बनलेला संजय खापरे, अभिजित केळकर, केतकी माटेगावकर, प्रिया बापट या कलाकारांनी खूपच मनापासून काम केलेलं आहे. ब्राम्हणी लूक हवा यासाठी अठ्ठावीस कलाकारांनी मुंडण केलंय आणि यामध्ये सविता मालपेकर यांचाही समावेश आहे. कोकणातली लाल आजी त्यांनी अगदी खासच साकारलेली आहे. कमरेत वाकून चालणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार केलेला आहे. तर काकस्पर्श या सिनेमाचा कणा आहे सचिन खेडेकर.. अतिशय जबरदस्त अभिनय सचिननं या सिनेमात केला आहे. कशाला उद्याची बात नंतर लगेचच सचिनचा सुंदर अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. तरुणपणातला हरी असो किंवा म्हातारपणाकडे झुकलेला, सचिनने हा रोल खरंच ताकदीनं साकारलाय. काही कलाकारांची निवड चुकलीये असं वाटत राहतं पण तरीही एक उत्तम सिनेमा बघितला याचं समाधान जे हल्ली जरा कमीच मिळतं ते प्रेक्षकांना नक्कीच मिळतं.

  • Share this:

05 मे

'काकस्पर्श' हा उषा दातार यांनी चारपानी कथा लिहिली होती, त्याच कथेवर आधारित हा सिनेमा, दिग्दर्शक महेश मांजरेकर.. काळ 1930 ते 1945 दरम्यानचा काळ, त्याकाळातलं कोकणातलं एक कुटुंब, कोकणातलं घर, त्याकाळातली माणसं, धार्मिक रुढी-परंपरा, आसपास कर्मठ वातावरण, नीती-अनीतीच्या कल्पना, नाती-ऋणानुबंध, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे हरप्रकारे सुरु असलेले प्रयत्न आणि याच काळातली एक विलक्षण प्रेमकहाणी... कथेबद्दल सांगायचं तर एवढंच सांगता येईल.. खरंतर प्रेम आणि त्यागाची कहाणी असंही म्हणता येईल. दिग्दर्शक महेश मांजरेकर, कथा ऐकल्यावर एकदम भारावूनच गेले आणि त्यांनी चंगच बांधला की यावर आपणच सिनेमा करायचा. हे सगळं आतापर्यंत तुम्ही मुलाखतींमध्ये ऐकलेलं आहेच, पण ते इथे पुन्हा सांगायचं कारण याच विषयावर सिनेमा बनवण्यासाठीचं एका दिग्दर्शकाचं झपाटलेपण सिनेमा बघताना जाणवत राहतं.

खरंतर काकस्पर्श या नावावरुन आणि सिनेमाच्या लूकवरुन हा सिनेमा जुन्या काळातला आहे हे तर कळतं पण त्याचबरोबर प्रोमोमधून विषय गंभीर आहे हेसुध्दा लक्षात येतं. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि लालबाग परळ या सिनेमांमध्येसुध्दा काहीतरी मिसिंग होतं, पण ते महेश मांजरेकर यांना सापडलं काकस्पर्शमध्ये असं नक्कीच म्हणता येईल. जबरदस्त कथा, मग पटकथेवर केलेले उत्तम संस्कार, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची मेहनत यामुळे सुंदर सिनेमा कसा बनतो याचं आजच्या काळातलं उदाहरण आहे काकस्पर्श. एकतर जुना काळ दाखवायचा याचं तांत्रिक आव्हान त्यांच्यापुढे होतंच पण त्याचबरोबर कलाकारांची निवड, त्यांचा लूक याही गोष्टी होत्याच..

गारंबीचा बापू सारख्या सिनेमातून, श्रीना पेंडसे, गोनी दांडेकरांच्या पुस्तकांमधून, 'कुछ खोया कुछ पाया' या पडघवली पुस्तकावर आधारित हिंदी मालिकेत आपल्याला हेच अस्सल कोकणी कर्मठ, सनातनी वातावरण दिसलेलं आहे, तोच काळ पुन्हा एकदा काकस्पर्शमधून उभा करण्यात आलाय, त्यात या सिनेमाची कथा काल्पनिक असल्यामुळे संशोधन झालंय ते त्या काळावर... फक्त घरच नाही घरामागची विहीर, नारळ-सुपारीची बाग, मंदिर हे सगळं जसंच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न खूपच यशस्वी झालेला आहे. दिग्दर्शक जसा कथेच्या प्रेमात पडला तसाच सिनेमा बघितल्यावर प्रेक्षकही कथेनं भारावून गेलेला असतो.

याशिवाय दिग्दर्शकाला अतिशय चांगली साथ मिळालीये ती कलाकारांची.. मेधा मांजरेकर यांची घरातली कर्ती सवरती बाई, स्वातंत्र्यसैनिक बनलेला संजय खापरे, अभिजित केळकर, केतकी माटेगावकर, प्रिया बापट या कलाकारांनी खूपच मनापासून काम केलेलं आहे. ब्राम्हणी लूक हवा यासाठी अठ्ठावीस कलाकारांनी मुंडण केलंय आणि यामध्ये सविता मालपेकर यांचाही समावेश आहे. कोकणातली लाल आजी त्यांनी अगदी खासच साकारलेली आहे. कमरेत वाकून चालणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार केलेला आहे. तर काकस्पर्श या सिनेमाचा कणा आहे सचिन खेडेकर.. अतिशय जबरदस्त अभिनय सचिननं या सिनेमात केला आहे. कशाला उद्याची बात नंतर लगेचच सचिनचा सुंदर अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. तरुणपणातला हरी असो किंवा म्हातारपणाकडे झुकलेला, सचिनने हा रोल खरंच ताकदीनं साकारलाय. काही कलाकारांची निवड चुकलीये असं वाटत राहतं पण तरीही एक उत्तम सिनेमा बघितला याचं समाधान जे हल्ली जरा कमीच मिळतं ते प्रेक्षकांना नक्कीच मिळतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 03:11 PM IST

ताज्या बातम्या