बापरे! नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात सापडली जिवंत काडतुसे

बापरे! नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात सापडली जिवंत काडतुसे

नागपूरमध्ये 98 जिवंत काडतुसं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नागपूर, प्रवीण मुधोळकर, 19 मार्च : नागपूरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात जिवंत काडतुसे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल 98 जिवंत काडतुसं सापडली आहेत. प्लॅटफॉर्म नंबर सातवरील मेन्टेनन्स विभागात ही काडतुसं सापडली आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता अधिक तपास सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये स्फोटकं सापडण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी कर्जत, नाशिक, पालघरमध्ये देखील स्फोटकं आणि बॉम्बसदृश्य वस्तु सापडल्या आहेत. त्याबाबत देखील तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये स्फोटकं जप्त

यापूर्वी 17 मार्च रोजी देखील सटाणा - सुरत मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. महाराष्ट्र -गुजरात सीमेवर जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर स्फोटकांचा साठा बोलेरो जीपमधून जप्त करण्यात आला होता. सटाणा - सुरत मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली होती. यामध्ये 2150 जिलेटीन कांड्या आणि 1750 डिटोनेटर जप्त करण्यात आलं होतं. तर, एकाला अटक करण्यात आली होती. अटक केलेला आरोपी हा राजस्थानचा रहिवासी आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर केलेली ही राज्यातील दुसरी मोठी कारवाई होती. यापूर्वी देखील पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली होती.

'राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार',DMKच्या जाहीरनाम्यानं खळबळ

पालघरमध्ये देखील मोठी कारवाई

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं 8 मार्च रोजी मोठी कारवाई केली होती. बोईसर-चिल्हार फाटा येथे पालघरच्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखा युनिटने जिलेटिन आणि डिटोनेटरनं भरलेले दोन टेम्पो जप्त केले होते.

गुजरातहून हे दोन्ही टेम्पो आले होते. दरम्यान चेक नाका असताना देखील टेम्पोतून स्फोटकं आणली कशी? असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यापूर्वी देखील पालघरमध्ये 24 डेटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडलं होतं.

VIDEO: दाऊदबद्दल प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

First published: March 19, 2019, 1:47 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading