लष्करप्रमुखांची सीबीआयकडे तक्रार

10 एप्रिललष्करासाठी निकृष्ट दर्जाचे ट्रक खरेदी करण्यासाठी आपल्याला 14 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी केला होता. याप्रकरणी सिंग यांनी आज सीबीआयकडे लिखित तक्रार केलीय. निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनीच आपल्याला लाच देऊ केली होती, असा आरोप सिंग यांनी या तक्रारीत केला आहे. त्यामुळे तेजिंदर सिंग यांच्याविरोधात सीबीआय गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेजिंदर सिंग यांनीही लष्कर प्रमुखांविरोधात पटियाला हाऊस कोर्टात मानहानी याचिका दाखल केलीय. याप्रकरणी लष्कर प्रमुखांना समन्स बजावायचे की नाही, यावर कोर्ट 21 तारखेला निर्णय देणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2012 11:15 AM IST

लष्करप्रमुखांची सीबीआयकडे तक्रार

10 एप्रिल

लष्करासाठी निकृष्ट दर्जाचे ट्रक खरेदी करण्यासाठी आपल्याला 14 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी केला होता. याप्रकरणी सिंग यांनी आज सीबीआयकडे लिखित तक्रार केलीय. निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनीच आपल्याला लाच देऊ केली होती, असा आरोप सिंग यांनी या तक्रारीत केला आहे. त्यामुळे तेजिंदर सिंग यांच्याविरोधात सीबीआय गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेजिंदर सिंग यांनीही लष्कर प्रमुखांविरोधात पटियाला हाऊस कोर्टात मानहानी याचिका दाखल केलीय. याप्रकरणी लष्कर प्रमुखांना समन्स बजावायचे की नाही, यावर कोर्ट 21 तारखेला निर्णय देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...