राजीनामा देणार नाही - राजन वेळुकर

राजीनामा देणार नाही - राजन वेळुकर

05 एप्रिलमाझ्या राजीनाम्याच्या बातम्या मला केवळ प्रसारमाध्यमांकडून कळत आहे. केवळ 15 दिवसातील झालेल्या घडामोडीबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून केलेल्या माझ्या कामाबद्दल कुणीही बोलत नाही. मी राजीनामा देणार नाही, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी स्पष्ट केलं. पेपरफुटी प्रकरणी वादात अडकलेले कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना हटवण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात वेळुकर यांना पदावरून दूर करण्यासंबंधीची विनंती राज्यपालांकडे करावी, असा आग्रह काही ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला. तसेच राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या शिफारसीवरून मुख्यमंत्री कदाचित राज्यपालांकडे डॉ. वेळुकर यांना राजीनामा द्यायला सांगण्यात यावे अशी विनंती करण्याची शक्यता आहे आज युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि कुलगुरू राजन वेळुकरांना हटवण्याची मागणी केली. मात्र, केवळ 15 दिवसातील झालेल्या घडामोडीबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून केलेल्या माझ्या कामाबद्दल कुणीही बोलत नाही. मी राजीनामा देणार नाही, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

05 एप्रिल

माझ्या राजीनाम्याच्या बातम्या मला केवळ प्रसारमाध्यमांकडून कळत आहे. केवळ 15 दिवसातील झालेल्या घडामोडीबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून केलेल्या माझ्या कामाबद्दल कुणीही बोलत नाही. मी राजीनामा देणार नाही, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी स्पष्ट केलं. पेपरफुटी प्रकरणी वादात अडकलेले कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना हटवण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात वेळुकर यांना पदावरून दूर करण्यासंबंधीची विनंती राज्यपालांकडे करावी, असा आग्रह काही ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला.

तसेच राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या शिफारसीवरून मुख्यमंत्री कदाचित राज्यपालांकडे डॉ. वेळुकर यांना राजीनामा द्यायला सांगण्यात यावे अशी विनंती करण्याची शक्यता आहे आज युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि कुलगुरू राजन वेळुकरांना हटवण्याची मागणी केली. मात्र, केवळ 15 दिवसातील झालेल्या घडामोडीबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून केलेल्या माझ्या कामाबद्दल कुणीही बोलत नाही. मी राजीनामा देणार नाही, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी स्पष्ट केलं.

First published: April 5, 2012, 1:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading