राजन वेळुकर यांना हटवणार ?

राजन वेळुकर यांना हटवणार ?

05 एप्रिलमुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुपदावरुन डॉ.राजन वेळुकर यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. राज्य सरकारनही वेळुकर यांच्या, उचलबांगडीच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्याचं दिसतंय. पण त्याच वेळी वेळुकरांनीही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता वेळुकर जाणार की राहणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.मुंबई विद्यापीठात पेपरफुटीमुळे आता कुलगुरू वेळुकर यांची खुर्चीवर डगमगू लागली आहे. म्हणून एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी वेळुकरांना हटवण्याचा आग्रह धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.. राज्यपाल आणि कुलपती के शंकरनारायणन हेही वेळुकरांवर नाराज आहेत. पण वेळुकरांनीही ताबडतोब नारायण राणेंची भेट घेऊन राजकीय मदत मिळवली. त्यामुळे अजूनपर्यंत त्यांच्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.दुसरीकडे.. वेळुकरांना हटवण्यासाठी विरोधक आक्रमक झालेत. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या 20 प्रकरणांची यादी राज्यपालांना सादर केली.विद्यापीठाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होतो, हे उघड गुपित आहे. पण वेळुकरांच्या निमित्ताने हा हस्तक्षेप कधी नव्हता एवढा वाढला. ही लढाई आता विद्यापीठाची राहिली नसून आघाडीतले काही नेते विरुद्ध शिवसेना.. अशी लढली जातेय.

  • Share this:

05 एप्रिल

मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुपदावरुन डॉ.राजन वेळुकर यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. राज्य सरकारनही वेळुकर यांच्या, उचलबांगडीच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्याचं दिसतंय. पण त्याच वेळी वेळुकरांनीही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता वेळुकर जाणार की राहणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.मुंबई विद्यापीठात पेपरफुटीमुळे आता कुलगुरू वेळुकर यांची खुर्चीवर डगमगू लागली आहे. म्हणून एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी वेळुकरांना हटवण्याचा आग्रह धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.. राज्यपाल आणि कुलपती के शंकरनारायणन हेही वेळुकरांवर नाराज आहेत. पण वेळुकरांनीही ताबडतोब नारायण राणेंची भेट घेऊन राजकीय मदत मिळवली. त्यामुळे अजूनपर्यंत त्यांच्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.दुसरीकडे.. वेळुकरांना हटवण्यासाठी विरोधक आक्रमक झालेत. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या 20 प्रकरणांची यादी राज्यपालांना सादर केली.विद्यापीठाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होतो, हे उघड गुपित आहे. पण वेळुकरांच्या निमित्ताने हा हस्तक्षेप कधी नव्हता एवढा वाढला. ही लढाई आता विद्यापीठाची राहिली नसून आघाडीतले काही नेते विरुद्ध शिवसेना.. अशी लढली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 09:24 AM IST

ताज्या बातम्या