राज्यसभेच्या जागेसाठी 7 उमेदवार मैदानात

राज्यसभेच्या जागेसाठी 7 उमेदवार मैदानात

19 मार्चपुण्याचे ठेकेदार संजय काकडे यांच्यामुळे राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार असं दिसतंय. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातले बडे ठेकेदार संजय काकडे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार्‍या 10 अपक्ष आमदारांमध्ये काँग्रेसला सत्तेत पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांचा भरणा होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येणं कठीण समजलं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसर्‍या उमेदवाराचं नाव उशिरानं जाहीर करण्यात आलं. डी. पी. त्रिपाठी यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. राष्ट्रवादीला दोन्ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर 84 मतांची गरज आहे. पण राष्ट्रवादीला दुसर्‍या उमेदवारासाठी 22 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ही 22 मतं इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या रुपात मिळवू असा दावा पक्ष नेत्यांनी केला आहे. एवढंच नाही तर मनसेची मतं वळवण्याचाही राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु असल्याचं समजतं. त्यामुळेच संजय काकडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही तरी राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येणं शक्य आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. राज्यसभा उमेदवारांच्या मालमत्ताअजय संचेती - भाजप उमेदवार- एकूण संपत्ती 76 कोटी 89 लाखराजीव शुक्ला - काँग्रेस उमेदवार- 24 कोटी 71 लाख- वंदना चव्हाण - राष्ट्रवादी उमेदवार- 2 कोटी 9 लाख- डी. पी. त्रिपाठी - राष्ट्रवादी उमेदवार- 24 लाख 72 हजार

  • Share this:

19 मार्च

पुण्याचे ठेकेदार संजय काकडे यांच्यामुळे राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार असं दिसतंय. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातले बडे ठेकेदार संजय काकडे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार्‍या 10 अपक्ष आमदारांमध्ये काँग्रेसला सत्तेत पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांचा भरणा होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येणं कठीण समजलं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसर्‍या उमेदवाराचं नाव उशिरानं जाहीर करण्यात आलं. डी. पी. त्रिपाठी यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. राष्ट्रवादीला दोन्ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर 84 मतांची गरज आहे. पण राष्ट्रवादीला दुसर्‍या उमेदवारासाठी 22 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ही 22 मतं इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या रुपात मिळवू असा दावा पक्ष नेत्यांनी केला आहे. एवढंच नाही तर मनसेची मतं वळवण्याचाही राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु असल्याचं समजतं. त्यामुळेच संजय काकडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही तरी राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येणं शक्य आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.

राज्यसभा उमेदवारांच्या मालमत्ताअजय संचेती - भाजप उमेदवार- एकूण संपत्ती 76 कोटी 89 लाखराजीव शुक्ला - काँग्रेस उमेदवार- 24 कोटी 71 लाख- वंदना चव्हाण - राष्ट्रवादी उमेदवार- 2 कोटी 9 लाख- डी. पी. त्रिपाठी - राष्ट्रवादी उमेदवार- 24 लाख 72 हजार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2012 10:45 AM IST

ताज्या बातम्या