महाशतकाची गुढी

महाशतकाची गुढी

16 मार्चगेले वर्षभर अवघं जग ज्याची आतुरतेनं वाट पाहत होतं , तो रेकॉर्ड आज झाला. सचिन तेंडुलकरचं अखेर महाशतक झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननं विश्वविक्रम रचला आहे. मिरपूर वनडे मध्ये सचिनने 80 रन्सचा टप्पा ओलांडला तेव्हाच भारतातच नव्हे तर अवघं जग सचिनच्या महाशतकाकडे डोळे लावून बसलं होतं. आणि अखेर तो क्षण आला. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरोधात सेंच्युरी ठोकल्यानंतर सचिन सेंच्युरीच्या प्रतीक्षेत होता. वर्षभरात दोन-तीन वेळा सेंच्युरी करण्याची संधी त्याला मिळाली. पण सेंच्युरी पूर्ण होऊ शकली नाही. अखेर आज बांगलादेशविरोधात ही कामगिरी त्यानं केली. सचिननं दहा फोर आणि एक सिक्स ठोकत 136 बॉल्समध्ये सेंच्युरी पूर्ण केली. आणि अखेर तो 114 रन्सवर आऊट झाला. इंग्लंड, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरींची सेंच्युरी करण्याच्या रेकॉर्डने सचिनला हुलकावणी दिली. पण वर्षभरातनंतर सचिननं एशिया कप स्पर्धेत हा रेकॉर्ड पूर्ण केला. तेव्हाचा नुकतं मिसुरडं फुटलेला सचिन आणि आताचा विक्रमांचा बादशहा असलेला सचिन. सचिनचा जन्मच बॅटिंगसाठी झाला. विंडीजविरुध्दच्या टेस्टमध्ये तर त्याने सर्वोच्च विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण केली. गेले आठ महिने क्रिकेटप्रेमी या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीच्या प्रतिक्षेत होते आणि अखेर आज सचिननं हा रेकॉर्ड पूर्ण केला. पदार्पणाच्या सीरिजमध्ये पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सचा मुकाबला ज्या समर्थपणे त्यानं केला, त्याच जोशात त्यानं वन डेतही पहिलीवहिली डबलसेंच्युरीही ठोकली. पहिली सेंच्युरी जेव्हा त्यानं केली तेव्हा भारतीय टीमला त्यानं पराभवापासून वाचवलं होतं. त्याच्या प्रत्येक सेंच्युरीची करोडो क्रीडाप्रेमी वाट बघतात. जगातल्या प्रत्येक बॉलरला त्यानं प्रभावीपणे उत्तर दिलंय. बॅटिंगमधला एकही रेकॉर्ड नाही जो सचिनच्या नावावर नाही. आणि काही रेकॉर्डच्या बाबतीत तर त्याचं स्थान अढळ आहे. सचिननं खेळायला सुरुवात केली तो काळच बॅट्समनच्या दादागिरीचा होता. त्यामुळे सचिनला प्रतिस्पर्धीही अनेक होते, वेस्टइंडिजचा ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉण्टिंग यांच्याशी त्याची तुलना कायम झाली. नंतर तर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्याची स्पर्धा सेहवाग, द्रविड, लक्ष्मण यांच्याशी समीक्षकांनी लावली. पण अंतिम सत्य हे आहे की सचिनची रन्सची भूक इतर बॅट्समनपेक्षा जास्त आहे. वन डे क्रिकेटमध्ये तर त्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल असा बॅट्समन शोधून सापडणार नाही. वर्ल्ड कप सारख्या सर्वोच्च स्पर्धेत सर्वात जास्त रन्स सचिनच्या नावावर आहेत. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप उचलण्याचा मानही त्याला लाभला. टेस्ट क्रिकेटमध्ये गेली दोन दशकं त्यानं भारतीय बॅटिंगची धूरा वाहिली. काहीवेळा धडाकेबाज बॅटिंग करत तर काहीवेळा कलात्मक शॉट्स खेळत त्यानं क्रीडाप्रेमींची मनं जिंकली. सचिन भारतीय टीममध्ये जेव्हा आले तेव्हा सध्याचे त्याचे काही साथीदार नुकतं उभं राहिला शिकत होते. पण तरिही सचिन त्यांच्यासाठी सीनिअर खेळाडू नाही तर त्यांचा मित्र आहे. आणि गरज पडली तर मार्गदर्शकही. आता क्रिकेटमध्ये नवा टप्पा त्यानं गाठलाय, पण त्याचा प्रवास पुढे सुरुच राहणार आहे.

  • Share this:

16 मार्च

गेले वर्षभर अवघं जग ज्याची आतुरतेनं वाट पाहत होतं , तो रेकॉर्ड आज झाला. सचिन तेंडुलकरचं अखेर महाशतक झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननं विश्वविक्रम रचला आहे. मिरपूर वनडे मध्ये सचिनने 80 रन्सचा टप्पा ओलांडला तेव्हाच भारतातच नव्हे तर अवघं जग सचिनच्या महाशतकाकडे डोळे लावून बसलं होतं. आणि अखेर तो क्षण आला. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरोधात सेंच्युरी ठोकल्यानंतर सचिन सेंच्युरीच्या प्रतीक्षेत होता. वर्षभरात दोन-तीन वेळा सेंच्युरी करण्याची संधी त्याला मिळाली. पण सेंच्युरी पूर्ण होऊ शकली नाही. अखेर आज बांगलादेशविरोधात ही कामगिरी त्यानं केली. सचिननं दहा फोर आणि एक सिक्स ठोकत 136 बॉल्समध्ये सेंच्युरी पूर्ण केली. आणि अखेर तो 114 रन्सवर आऊट झाला.

इंग्लंड, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरींची सेंच्युरी करण्याच्या रेकॉर्डने सचिनला हुलकावणी दिली. पण वर्षभरातनंतर सचिननं एशिया कप स्पर्धेत हा रेकॉर्ड पूर्ण केला.

तेव्हाचा नुकतं मिसुरडं फुटलेला सचिन आणि आताचा विक्रमांचा बादशहा असलेला सचिन. सचिनचा जन्मच बॅटिंगसाठी झाला. विंडीजविरुध्दच्या टेस्टमध्ये तर त्याने सर्वोच्च विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण केली. गेले आठ महिने क्रिकेटप्रेमी या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीच्या प्रतिक्षेत होते आणि अखेर आज सचिननं हा रेकॉर्ड पूर्ण केला. पदार्पणाच्या सीरिजमध्ये पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सचा मुकाबला ज्या समर्थपणे त्यानं केला, त्याच जोशात त्यानं वन डेतही पहिलीवहिली डबलसेंच्युरीही ठोकली. पहिली सेंच्युरी जेव्हा त्यानं केली तेव्हा भारतीय टीमला त्यानं पराभवापासून वाचवलं होतं. त्याच्या प्रत्येक सेंच्युरीची करोडो क्रीडाप्रेमी वाट बघतात.

जगातल्या प्रत्येक बॉलरला त्यानं प्रभावीपणे उत्तर दिलंय. बॅटिंगमधला एकही रेकॉर्ड नाही जो सचिनच्या नावावर नाही. आणि काही रेकॉर्डच्या बाबतीत तर त्याचं स्थान अढळ आहे. सचिननं खेळायला सुरुवात केली तो काळच बॅट्समनच्या दादागिरीचा होता. त्यामुळे सचिनला प्रतिस्पर्धीही अनेक होते, वेस्टइंडिजचा ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉण्टिंग यांच्याशी त्याची तुलना कायम झाली. नंतर तर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्याची स्पर्धा सेहवाग, द्रविड, लक्ष्मण यांच्याशी समीक्षकांनी लावली. पण अंतिम सत्य हे आहे की सचिनची रन्सची भूक इतर बॅट्समनपेक्षा जास्त आहे. वन डे क्रिकेटमध्ये तर त्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल असा बॅट्समन शोधून सापडणार नाही. वर्ल्ड कप सारख्या सर्वोच्च स्पर्धेत सर्वात जास्त रन्स सचिनच्या नावावर आहेत. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप उचलण्याचा मानही त्याला लाभला.

टेस्ट क्रिकेटमध्ये गेली दोन दशकं त्यानं भारतीय बॅटिंगची धूरा वाहिली. काहीवेळा धडाकेबाज बॅटिंग करत तर काहीवेळा कलात्मक शॉट्स खेळत त्यानं क्रीडाप्रेमींची मनं जिंकली. सचिन भारतीय टीममध्ये जेव्हा आले तेव्हा सध्याचे त्याचे काही साथीदार नुकतं उभं राहिला शिकत होते. पण तरिही सचिन त्यांच्यासाठी सीनिअर खेळाडू नाही तर त्यांचा मित्र आहे. आणि गरज पडली तर मार्गदर्शकही. आता क्रिकेटमध्ये नवा टप्पा त्यानं गाठलाय, पण त्याचा प्रवास पुढे सुरुच राहणार आहे.

First published: March 16, 2012, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading