चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...

चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...

चीनने वॅक्सीनच्या संशोधनासाठी अशा कंपन्यांना परवानगी दिली आहे ज्या निकृष्ट दर्जासाठी ओळखल्या जातात.

  • Share this:

बिजिंग, 06 मे : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात अनेक देश युद्धपातळीवर पर्यत्न करत आहेत. यावर अद्याप कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही. कोरोना जगात पसरवल्याचा आरोप चीनवर होत आहे. यातून वाचण्यासाठी चीनकडून आता वेगळीच पावलं उचलली जात आहेत. त्यांनी ड्रग्ज कंपन्यांना वॅक्सीन तयार करण्याची तात्काळ परवानगी दिली आहे. संबंधित कंपन्यांनी मानवी चाचणीला सुरुवातही केली आहे. धक्कादायक म्हणजे या कंपन्या वादग्रस्त आहेत. तसंच अनेक प्रकरणात त्या अडकलेल्या आहे. याबाबतचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे.

चीनने वॅक्सीनच्या निर्मितीला प्राधान्य दिलं आहे. मात्र यावर खर्च किती होणार याबाबत सांगण्यात आलेलं नाही. सप्टेंबरपर्यंत वॅक्सीन तयार होईल असं सांगितलं जात आहे. चीनमधील नागरिकांना त्यांच्या देशात तयार होणाऱ्या वॅक्सीनवर विश्वास नसल्याचं तिथल्या गेट्स फाउंडेशनचे रे यिप यांनी म्हटलं आहे.

वॅक्सीनची निर्मिती कऱणाऱ्या कंपन्या राजकीय बळाचा वापर करत आहेत. काही कांपन्यांनी रिसर्च आमि डेव्हलपमेंटवर खर्च केला आहे. मात्र त्यांना आतापर्यंत कोणतंही जागतिक परिणाम होईल असं प्रोडक्ट तयार केलेलं नाही. काही कंपन्यांनी विक्री आणि वितरणामध्ये गुंतवणूक केली आहे.

वॅस्कीन तयार करणाऱ्या इंडस्ट्री या 40 टक्के स्टेक फर्म्समधील आहेत. अनेक वॅक्सीन तयार कऱणाऱ्या कंपन्यांना माहिती आहे की त्यांनी चुकीचं आणि खराब प्रोडक्ट तयार केलं तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही.  तियानजिनमधील कॅनसिनो बायोलॉजिक्स हे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेडिकलचा भाग आहे. दुसऱ्या टप्प्यात पोहोचणारी ती पहिली कंपनी होती. तसंच जगातील इतर कंपन्यांच्या पुढे असली तरी ही प्रभावी असल्याचा कोणताही पुरावा नाही.

हे वाचा : कोरोनाव्हायरसविरोधातील लसीचं ह्युमन ट्रायल सुरू, आता परिणामांची प्रतीक्षा

याशिवाय वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्ससुद्धा टेस्टिंगच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. या कंपनीवर डिप्थेरिया, टिटनस, खोकल्यासह इतर त्रासावर निकृष्ट दर्जाचं वॅक्सीन तयार केल्याचा आरोप आहे.  कंपनीविरुद्ध आतापर्यंत दोन वेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांवर वॅक्सीन खरेदी करण्यासाठी लोकल हेल्थ अथॉरिटीजना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कंपनीविरुद्द गुन्हा नोंद झाला नाही.

हे वाचा : 173 वर्षांपूर्वी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवत कोरोनाच्या संकटात दिला हात!

कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या परवानगीवर तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सुरुवातीच्या आधी पहिल्या टप्प्यात काय झालं याची माहिती घ्यायला हवी. मला माहिती आहे की लोक वॅक्सीनची वाट बघत आहेत पण शास्त्रज्ञांच्या नजरेनं पाहिलं तर कितीही घाबरलो असलो तरी वॅक्सीनचा दर्जा घसरू देता येणार नाही.

हे वाचा : ‘कोरोना’विरूद्धची सगळ्यात मोठी बातमी, ‘लस’शोधल्याचा इटलीचा दावा

वुहानमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या मेडिकल स्टुडंटने टेस्टिंगसाठी होकार दिला. विद्यार्थ्यांच्या मते, मी यातून लोकांची मदत करू शकते तर ते सार्थक होईल. वॅक्सिनच्या 15 मिनिटानंतर विद्यार्थिनीची तब्येत बिघडायला लागली. तिला चक्कर येऊ लागली, पोटात दुखायला लागलं आणि हृदयाची धडधडही वाढली. मात्र घरी पोहोचचल्यानंतर तब्येत ठिक झाल्याचंही तिने सांगितलं.

हे वाचा : कोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या

First published: May 6, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading