सपामधून आग्रह, अखिलेश यादव हवे मुख्यमंत्री !

सपामधून आग्रह, अखिलेश यादव हवे मुख्यमंत्री !

07 मार्चविधानसभा निवडणुकीत सपाने झेंडा फडकावल्यानंतर आज मुख्यमंत्रीपदी कोण यावर चर्चेन जोर धरला आहे. समाजवादी पार्टीनं सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आतापर्यंत मुलायमसिंह यादव हेच मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. पण आता सपाच्या विजयाचा हिरो ठरलेला अखिलेश यादव याला मुख्यमंत्री करावं याबद्दल सपामधूनच आग्रह वाढत आहे. समाजवादी पार्टीची बैठक सुरू झाली. आणि त्यामध्ये ही मागणी होण्याची शक्यता आहे. मायावतींनी राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला. नवं सरकार बनेपर्यंत मायावती काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. मायावतींच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कॅबिनेट सचिव शशांक शेखर सिंह यांनी निवृत्ती घेतल्याची माहिती आहे.तर संध्याकाळी पाच वाजता समाजवादी पार्टीच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे. त्याआधी सपा राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

  • Share this:

07 मार्च

विधानसभा निवडणुकीत सपाने झेंडा फडकावल्यानंतर आज मुख्यमंत्रीपदी कोण यावर चर्चेन जोर धरला आहे. समाजवादी पार्टीनं सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आतापर्यंत मुलायमसिंह यादव हेच मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. पण आता सपाच्या विजयाचा हिरो ठरलेला अखिलेश यादव याला मुख्यमंत्री करावं याबद्दल सपामधूनच आग्रह वाढत आहे. समाजवादी पार्टीची बैठक सुरू झाली. आणि त्यामध्ये ही मागणी होण्याची शक्यता आहे. मायावतींनी राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला. नवं सरकार बनेपर्यंत मायावती काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. मायावतींच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कॅबिनेट सचिव शशांक शेखर सिंह यांनी निवृत्ती घेतल्याची माहिती आहे.तर संध्याकाळी पाच वाजता समाजवादी पार्टीच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे. त्याआधी सपा राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 11:31 AM IST

ताज्या बातम्या