Elec-widget

राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी ठसा

राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी ठसा

07 मार्चतमाम मराठी जनांसाठी आणि मराठी सिनेमासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा होता. 59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली आणि त्यावर ठसा होता मराठी सिनेमांचा. या बातमीमुळे होळीच्या उत्साहातही भर पडली. 1954 साली श्यामची आई या सिनेमाला आणि 2004 साली श्वास या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2004 नंतर आता यावर्षी देऊळ या सिनेमानं स्वर्णकमळ पटकावलंय. याशिवाय बालगंधर्व आणि शाळा या सिनेमांनीसुध्दा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यश मिळवलं. आनंद पटवर्धन यांच्या जय भीम कॉम्रेड या डॉक्युमेंटरीलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द डर्टी पिक्चर सिनेमातल्या अभिनयासाठी विद्या बालनला मिळाला तर रा.वन या सिनेमानंसुध्दा स्पेशल इफेक्टस् विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. अर्थात, मराठी सिनेमांनी मिळवलेलं यश अभूतपूर्व असंच होतं. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर गिरीश कुलकर्णीनं देऊळसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट संवादासाठीसुद्धा देऊळसाठी गिरीश कुलकर्णी यांना पुरस्कार मिळाला.तर विक्रम गायकवाड यांना बालगंधर्व आणि द डर्टी पिक्चर या दोन्ही सिनेमांसाठी मेकअपसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर नीता लुल्ला यांना बालगंधर्वतील वेषभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आनंद भाटे यांना बालगंधर्वमधल्या गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.'जयभीम कॉम्रेड' ला राष्ट्रीय पुरस्कार तर आनंद पटवर्धन यांच्या 'जयभीम कॉम्रेड' या नव्या डॉक्युमेंटरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रमाबाई आंबेडकर नगरमधील गोळीबारानंतरच्या, माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनांचा दस्तावेज या फिल्ममध्ये आहे. गेल्या 15 वर्षांमधील महाराष्ट्रात जातीचं वास्तव काय आहे याचं डॉक्युमेंटेशन ही फिल्म करते. 11 जुलै 1997 रमाबाई आंबेडकरनगरमध्ये पोलिसांनी गोळीबार गेला आणि निष्पाप बळी गेलेे. या घटनेचा निषेध म्हणून एक संवेदनशील लोकशाहीर विलास घोगरे यांनी आत्महत्या केली.. नेमकं काय घडलं... ? काय घडत होतं? म्हणून या लोकशाहीराला जगणं नकोसं झालं याचा शोध म्हणजेच ही फिल्म.गावात पाळल्या जाणार्‍या अस्पृश्यतेपासून ते शहरातल्या जातीयतेच्या नागड्या वास्तवावर ही फिल्म कटाक्ष टाकते. दलितांमधलं जे नेतृत्व विकाऊ आहे ते नेतृत्व की जे तोतये म्हणतात ना त्यांना उघडं करण्याचा प्रयत्न करते. जे बाबासाहेबांच्या नावाचा वापर करतात आणि बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करतात अशांना जनतेसमोर उघडं नागडं करतेय. हे सुद्धा या फिल्मचं यश आहे. फिल्म बघताना अस्वस्थ करतात ती न्यायाच्या प्रतिक्षेतली माणसं आणि त्याहूनही दलितांवर होणारे अमानुष अत्याचार.इतिहास आपल्या डोक्यात रहात नाही. आपण टिव्ही बघतो आणि विसरुन जातो.. हे होऊ नये म्हणून ही फिल्म बनवली आहे. हा जो इतिहास आहे तो लोकांच्या डोळ्यासमोर रहावा. हे जे अत्याचार चालू आहेत त्याला 3,000 वर्ष झाले असतील. ते अजून वाढतायत आपलं संविधानाचं इम्पिलीमेंटेशन करत नाही आहोत.'जय भीम कॉम्रेड' ही फक्त एका जातीवरची फिल्म नाही. गोत्राचा अभिमान बाळगणारे प्रस्थापित, स्वत:ला 'मॉर्डन' म्हणवणार्‍यांचे इतर जातींबद्दलचे मागासलेले दृष्टीकोन आनंद पटवर्धन यांनी कॅमेर्‍यात 'कैद' केले आहे.

  • Share this:

07 मार्च

तमाम मराठी जनांसाठी आणि मराठी सिनेमासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा होता. 59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली आणि त्यावर ठसा होता मराठी सिनेमांचा. या बातमीमुळे होळीच्या उत्साहातही भर पडली. 1954 साली श्यामची आई या सिनेमाला आणि 2004 साली श्

वास या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2004 नंतर आता यावर्षी देऊळ या सिनेमानं स्वर्णकमळ पटकावलंय. याशिवाय बालगंधर्व आणि शाळा या सिनेमांनीसुध्दा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यश मिळवलं. आनंद पटवर्धन यांच्या जय भीम कॉम्रेड या डॉक्युमेंटरीलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द डर्टी पिक्चर सिनेमातल्या अभिनयासाठी विद्या बालनला मिळाला तर रा.वन या सिनेमानंसुध्दा स्पेशल इफेक्टस् विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. अर्थात, मराठी सिनेमांनी मिळवलेलं यश अभूतपूर्व असंच होतं.

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर गिरीश कुलकर्णीनं देऊळसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट संवादासाठीसुद्धा देऊळसाठी गिरीश कुलकर्णी यांना पुरस्कार मिळाला.तर विक्रम गायकवाड यांना बालगंधर्व आणि द डर्टी पिक्चर या दोन्ही सिनेमांसाठी मेकअपसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर नीता लुल्ला यांना बालगंधर्वतील वेषभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आनंद भाटे यांना बालगंधर्वमधल्या गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

'जयभीम कॉम्रेड' ला राष्ट्रीय पुरस्कार

तर आनंद पटवर्धन यांच्या 'जयभीम कॉम्रेड' या नव्या डॉक्युमेंटरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रमाबाई आंबेडकर नगरमधील गोळीबारानंतरच्या, माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनांचा दस्तावेज या फिल्ममध्ये आहे. गेल्या 15 वर्षांमधील महाराष्ट्रात जातीचं वास्तव काय आहे याचं डॉक्युमेंटेशन ही फिल्म करते. 11 जुलै 1997 रमाबाई आंबेडकरनगरमध्ये पोलिसांनी गोळीबार गेला आणि निष्पाप बळी गेलेे. या घटनेचा निषेध म्हणून एक संवेदनशील लोकशाहीर विलास घोगरे यांनी आत्महत्या केली.. नेमकं काय घडलं... ? काय घडत होतं? म्हणून या लोकशाहीराला जगणं नकोसं झालं याचा शोध म्हणजेच ही फिल्म.

गावात पाळल्या जाणार्‍या अस्पृश्यतेपासून ते शहरातल्या जातीयतेच्या नागड्या वास्तवावर ही फिल्म कटाक्ष टाकते. दलितांमधलं जे नेतृत्व विकाऊ आहे ते नेतृत्व की जे तोतये म्हणतात ना त्यांना उघडं करण्याचा प्रयत्न करते. जे बाबासाहेबांच्या नावाचा वापर करतात आणि बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करतात अशांना जनतेसमोर उघडं नागडं करतेय. हे सुद्धा या फिल्मचं यश आहे. फिल्म बघताना अस्वस्थ करतात ती न्यायाच्या प्रतिक्षेतली माणसं आणि त्याहूनही दलितांवर होणारे अमानुष अत्याचार.

इतिहास आपल्या डोक्यात रहात नाही. आपण टिव्ही बघतो आणि विसरुन जातो.. हे होऊ नये म्हणून ही फिल्म बनवली आहे. हा जो इतिहास आहे तो लोकांच्या डोळ्यासमोर रहावा. हे जे अत्याचार चालू आहेत त्याला 3,000 वर्ष झाले असतील. ते अजून वाढतायत आपलं संविधानाचं इम्पिलीमेंटेशन करत नाही आहोत.

'जय भीम कॉम्रेड' ही फक्त एका जातीवरची फिल्म नाही. गोत्राचा अभिमान बाळगणारे प्रस्थापित, स्वत:ला 'मॉर्डन' म्हणवणार्‍यांचे इतर जातींबद्दलचे मागासलेले दृष्टीकोन आनंद पटवर्धन यांनी कॅमेर्‍यात 'कैद' केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...