कोहली, बुमराहला देणार विश्रांती, BCCI चा निर्णय

कोहली, बुमराहला देणार विश्रांती, BCCI चा निर्णय

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघ सातत्याने खेळत असल्याने बीसीसीआय वर्ल्ड कपनंतर दौऱ्यात कोहली आणि बुमराहला विश्रांती दिली जाईल.

  • Share this:

मुंबई, 23 जून : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेनंतर भारतीय संघ दोन कसोटी, तीन एक दिवसीय आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कसोटीमध्ये विराट आणि बुमराह खेळतील मात्र, मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांना विश्रांती दिली जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यापासून दोघेही सातत्याने खेळत आहेत. त्यांच्यावरील तणावामुळे संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर न्यूझीलंड, आयपीएल आणि आता वर्ल्ड कप स्पर्धा खेळत आहे. सततच्या खेळामुळे खेळाडूंना विश्रांती मिळू शकलेली नाही. त्यांच्यावर पडत असलेल्या ताणाचा खेळावर परिणाम होऊ नये यासाठी आगामी स्पर्धेतील मर्यादित षटकाच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी पाहता ते फायनलला पोहचतील अशी आशा आहे. त्यामुळे 14 जुलैपर्यंत ते खेळत राहतील. म्हणूनच पुढच्या दौऱ्यासाठी त्यांना विश्रांतीची गरज असेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर किमान महिनाभर खेळाडूंना विश्रांती मिळेल. भारताचा दौऱा सुरू होण्याआधी मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी हे भारत ए संघासोबत जातील.

World Cup: शमीला धोनीचा मोलाचा सल्ला, हॅट्ट्रिकसह मिळवून दिला विजय!

SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या कर्णधाराची चाहत्यांकडून खिल्ली

First published: June 23, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading