शिवसेनेचं यश भाजप,आरपीआयमुळे - राज ठाकरे

शिवसेनेचं यश भाजप,आरपीआयमुळे - राज ठाकरे

17 फेब्रुवारीमहापालिकांच्या निवडणुकीत खूप शिकायला मिळाले आहे. पण आमच्याकडून काही चुका झाल्या आहे त्या पाहुन नक्की सुधारण्याचा प्रयत्न करु, आज जो निकाल लागला आहे तो समाधानी निकाल आहे. कुठे कसा पराभव झाला आहे यांचा पूर्ण निकाल हाती आल्यावर पुढेचे धोरण ठरवणार आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तसेच ठाण्यात नव्याने पक्षात फेरबदल करणार आहे असंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिवसेनेला आरपीआय आणि भाजपमुळे विजय मिळला आहे असा टोलाही लगावला.महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. मनसे किंग बनणार की किंगमेकर यावर वेगवेगळे तर्कविर्तक लढवले जात होते. पण राज यांनी किंग बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण निकाली हाती आला आणि 'इंजिन' रुळावरुन घसरले. मनसेला मुंबईत 27 जागा तर ठाण्यात 7 जागा मिळू शकल्या. यावर राज ठाकरे यांनी आपल्या निवास्थानी कृष्णकुंजवर पत्रकारांशी बातचीत केली. हाती आलेला निकाल आपल्याला मान्य आहे आणि त्यावर आपण समाधानी आहोत असं राज यांनी स्पष्ट केलं. पण शिवसेनेला जे यश मिळाले आहे ते भाजप आणि आरपीआयमुळे मिळाले आहे. शिवसेना त्यांना कधी विचार नव्हती त्यांचामुळे हा विजय मिळू शकला आहे असा टोला राज यांनी लगावला. या निवडणुकीतून खूप काही शिकायाला मिळाले पुढे ही चांगलं करण्याचा प्रयत्न करु, आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार पण ठाण्यात पक्षात फेरबदल करणार आहोत असंही राज यांनी स्पष्ट केलं. मला शरद पवार यांच्या सारखे राजकारण करता येत नाही. जिथे स्वता:ची माणसं उभी करुन लढावे. सहा वर्षाचा पक्ष आहे त्यामुळे काळजी घेऊ असंही राज म्हणाले. पण त्याचबरोबर राज यांनी मतदारांच्या डोक्यावर पराभावाचे खापर फोडले. एक तर ही लोक मतदान करणार नाही आणि पाच वर्ष भ्रष्टाचाराने बोंब मारणार हे योग्य नाही. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणीही राज यांनी केली. बाळासाहेबांशी आपण भेटणार आहात का ? असा सवाल विचारला असता राज यांनी आता काही नाही. अग्निपथ नाही आणि काही नाही असं उत्तर राज यांनी दिलं.अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN LokmatLike

  • Share this:

17 फेब्रुवारी

महापालिकांच्या निवडणुकीत खूप शिकायला मिळाले आहे. पण आमच्याकडून काही चुका झाल्या आहे त्या पाहुन नक्की सुधारण्याचा प्रयत्न करु, आज जो निकाल लागला आहे तो समाधानी निकाल आहे. कुठे कसा पराभव झाला आहे यांचा पूर्ण निकाल हाती आल्यावर पुढेचे धोरण ठरवणार आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तसेच ठाण्यात नव्याने पक्षात फेरबदल करणार आहे असंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिवसेनेला आरपीआय आणि भाजपमुळे विजय मिळला आहे असा टोलाही लगावला.

महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. मनसे किंग बनणार की किंगमेकर यावर वेगवेगळे तर्कविर्तक लढवले जात होते. पण राज यांनी किंग बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण निकाली हाती आला आणि 'इंजिन' रुळावरुन घसरले. मनसेला मुंबईत 27 जागा तर ठाण्यात 7 जागा मिळू शकल्या. यावर राज ठाकरे यांनी आपल्या निवास्थानी कृष्णकुंजवर पत्रकारांशी बातचीत केली. हाती आलेला निकाल आपल्याला मान्य आहे आणि त्यावर आपण समाधानी आहोत असं राज यांनी स्पष्ट केलं. पण शिवसेनेला जे यश मिळाले आहे ते भाजप आणि आरपीआयमुळे मिळाले आहे. शिवसेना त्यांना कधी विचार नव्हती त्यांचामुळे हा विजय मिळू शकला आहे असा टोला राज यांनी लगावला. या निवडणुकीतून खूप काही शिकायाला मिळाले पुढे ही चांगलं करण्याचा प्रयत्न करु, आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार पण ठाण्यात पक्षात फेरबदल करणार आहोत असंही राज यांनी स्पष्ट केलं. मला शरद पवार यांच्या सारखे राजकारण करता येत नाही. जिथे स्वता:ची माणसं उभी करुन लढावे. सहा वर्षाचा पक्ष आहे त्यामुळे काळजी घेऊ असंही राज म्हणाले. पण त्याचबरोबर राज यांनी मतदारांच्या डोक्यावर पराभावाचे खापर फोडले. एक तर ही लोक मतदान करणार नाही आणि पाच वर्ष भ्रष्टाचाराने बोंब मारणार हे योग्य नाही. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणीही राज यांनी केली. बाळासाहेबांशी आपण भेटणार आहात का ? असा सवाल विचारला असता राज यांनी आता काही नाही. अग्निपथ नाही आणि काही नाही असं उत्तर राज यांनी दिलं.

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 12:10 PM IST

ताज्या बातम्या