'आम्ही जिंकून दाखवलं'

'आम्ही जिंकून दाखवलं'

17 फेब्रुवारीकाय करुन दाखवलं ? विरोधाकांच्या या आरोपाला धुडकावून लावत शिवसेनेनं अखेर जिंकून दाखवत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेवर आपली 16 वर्षाची सत्ता शिवसेनेनं कायम राखली आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या प्रभावावर शंका घेतली होती पण आम्हीच त्यांना आडवे करुन दाखवले आहे असा ठाकरी टोला उध्दव ठाकरे यांनी आघाडीला लगावला. तसेच हे जनतेचं प्रेम होतं. आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असं आश्वासनही उध्दव यांनी दिले. महायुतीच्या विजयानंतर उध्दव यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. महानगरपालिकेवर 16 वर्षांची सत्ता शिवसेना कायम राखणार की नाही याभोवती विरोधाकांनी एकच गदारोळ केला. दुसरीकडे 'करुन दाखवलं !' या सेनेच्या जाहिरात मोहिमेला विरोधांनी लक्ष करत आरोपाचा भडीमार केला. पण सेना काही डगमगली नाही. विरोधाकांच्या प्रत्येक आरोपाला टोलावत सेनेनं आपला प्रचार सुरुच ठेवला. अखेर चौथ्यांदा विजयाचे नारळ फोडत शिवसेनेनं आपला बाल्लेकिल्ला ठाण्याचा गड राखला त्यापाठोपाठ मुंबईत 76 जागा मिळवतं आणि आपले सोबती भाजपने 29 जागा पटकावल्या तर रिपाइंने एक जागा जिंकत खातं उघडलं. या महायुतीने एकत्र मिळुन 107 जागेवर कब्जा करत महापालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांच्या रोखठोक ठाकरी प्रहारात सर्व पक्षांना गाशा गुंडाळ्याची वेळ आली. बाळासाहेबांचा करिश्मा या प्रचारावर दिसून आला. तसेच उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांचे जाळं हे या यशाच प्रमुख कारण समजलं जातं आहे. त्याचबरोबर वेळीच बंडोबांनी थंड केल्यामुळे पक्षाला मोठी हाणी ठळली. सुरुवातील सगळ्यात जास्त बंडखोरीचं निशान सेनेत स्पष्ट दिसत होते पण कसेबसे बंडोबा आवरले आणि मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीला पक्षाला नव्या चेहर्‍याना संधी दिली त्याचा फायदा आता स्पष्टपणे दिसुन आला आहे. आपण केल्या कामाचा खास ठाकरी शैलीत करण्यात आलेली जाहिरातीही महायुतीला थेट मतदारराजापर्यंत पोहचवले. त्याच जोडीला सगळ्यात मोठा फायदा झाला तो आरपीआय गटाचा. शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आल्यामुळे मतदारांचे दार मोठ्यादिलाने मोकळी झाली. तिकडे निकाल स्पष्ट होतातच शिवसैनिकांनी एकच मातोश्रीवर गर्दी 'जय भवानी,जय शिवाजी','छत्रपती शिवाजी महाराज की...जय' घोषणाकरत परिसर दणाणून सोडला. मुंबईत विविध भागात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. एव्हान मातोश्रीवर युवराज आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे खुद्द उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकात सहभागी होऊन विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन शिवसेना भवनकडे येत असताना चक्क घोषणांच्या निनादात त्यांना उचलून घेण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.मुंबई पालिकेचे सर्व निकाल जाहीर- महायुती 107 जागा- आघाडी - 67- मनसे - 27- इतर - 27अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

  • Share this:

17 फेब्रुवारी

काय करुन दाखवलं ? विरोधाकांच्या या आरोपाला धुडकावून लावत शिवसेनेनं अखेर जिंकून दाखवत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेवर आपली 16 वर्षाची सत्ता शिवसेनेनं कायम राखली आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या प्रभावावर शंका घेतली होती पण आम्हीच त्यांना आडवे करुन दाखवले आहे असा ठाकरी टोला उध्दव ठाकरे यांनी आघाडीला लगावला. तसेच हे जनतेचं प्रेम होतं. आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असं आश्वासनही उध्दव यांनी दिले. महायुतीच्या विजयानंतर उध्दव यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचा आनंद साजरा केला.

महानगरपालिकेवर 16 वर्षांची सत्ता शिवसेना कायम राखणार की नाही याभोवती विरोधाकांनी एकच गदारोळ केला. दुसरीकडे 'करुन दाखवलं !' या सेनेच्या जाहिरात मोहिमेला विरोधांनी लक्ष करत आरोपाचा भडीमार केला. पण सेना काही डगमगली नाही. विरोधाकांच्या प्रत्येक आरोपाला टोलावत सेनेनं आपला प्रचार सुरुच ठेवला. अखेर चौथ्यांदा विजयाचे नारळ फोडत शिवसेनेनं आपला बाल्लेकिल्ला ठाण्याचा गड राखला त्यापाठोपाठ मुंबईत 76 जागा मिळवतं आणि आपले सोबती भाजपने 29 जागा पटकावल्या तर रिपाइंने एक जागा जिंकत खातं उघडलं. या महायुतीने एकत्र मिळुन 107 जागेवर कब्जा करत महापालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांच्या रोखठोक ठाकरी प्रहारात सर्व पक्षांना गाशा गुंडाळ्याची वेळ आली. बाळासाहेबांचा करिश्मा या प्रचारावर दिसून आला. तसेच उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांचे जाळं हे या यशाच प्रमुख कारण समजलं जातं आहे. त्याचबरोबर वेळीच बंडोबांनी थंड केल्यामुळे पक्षाला मोठी हाणी ठळली.

सुरुवातील सगळ्यात जास्त बंडखोरीचं निशान सेनेत स्पष्ट दिसत होते पण कसेबसे बंडोबा आवरले आणि मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीला पक्षाला नव्या चेहर्‍याना संधी दिली त्याचा फायदा आता स्पष्टपणे दिसुन आला आहे. आपण केल्या कामाचा खास ठाकरी शैलीत करण्यात आलेली जाहिरातीही महायुतीला थेट मतदारराजापर्यंत पोहचवले. त्याच जोडीला सगळ्यात मोठा फायदा झाला तो आरपीआय गटाचा. शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आल्यामुळे मतदारांचे दार मोठ्यादिलाने मोकळी झाली.

तिकडे निकाल स्पष्ट होतातच शिवसैनिकांनी एकच मातोश्रीवर गर्दी 'जय भवानी,जय शिवाजी','छत्रपती शिवाजी महाराज की...जय' घोषणाकरत परिसर दणाणून सोडला. मुंबईत विविध भागात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. एव्हान मातोश्रीवर युवराज आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे खुद्द उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकात सहभागी होऊन विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन शिवसेना भवनकडे येत असताना चक्क घोषणांच्या निनादात त्यांना उचलून घेण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

मुंबई पालिकेचे सर्व निकाल जाहीर

- महायुती 107 जागा

- आघाडी - 67

- मनसे - 27

- इतर - 27

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 11:09 AM IST

ताज्या बातम्या