राज्यभरात थंडीचा पारा वाढला ; नाशिक @ 2.8

राज्यभरात थंडीचा पारा वाढला ; नाशिक @ 2.8

09 फेब्रुवारीदोन दिवसांपूर्वी राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सगळ्यात कमी तापमान नाशिकमध्ये 2.8 अंश इतक नोंदवलं गेलं आहे. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांचे मात्र प्रचंड नुकसान झालं आहे. थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेले आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झालं आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावरही या थंडीचा परिणाम झाला आहे. तर पुण्यात 4.6 अंश इतकं कमी तापमान होतं. तर मुंबईतही पारा 8.8 अंश सेल्सियसवर आला होता, पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी ही माहिती दिली. थंडीचा हा कडाका आणखी एक ते दोन दिवस असाच राहू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. पण आणखी थंडी वाढण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये काल 0.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पिकांवरचे दवबिंदूही गोठले आहेत. तर नाशिक शहरात 2.8 डिग्री सेल्सियसची नोंद झाली, यंदाच्या वर्षी मुंबईत 14 डिग्री सेल्सियसचा पारा गाठला आहे. तर परभणीमध्ये तापमान 7 डिग्री, नागपूरमध्ये 17 तर रत्नागिरीमध्येही 17 डिग्रीजची नोंद झाली.

  • Share this:

09 फेब्रुवारी

दोन दिवसांपूर्वी राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सगळ्यात कमी तापमान नाशिकमध्ये 2.8 अंश इतक नोंदवलं गेलं आहे. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांचे मात्र प्रचंड नुकसान झालं आहे. थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेले आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झालं आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावरही या थंडीचा परिणाम झाला आहे. तर पुण्यात 4.6 अंश इतकं कमी तापमान होतं. तर मुंबईतही पारा 8.8 अंश सेल्सियसवर आला होता, पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी ही माहिती दिली. थंडीचा हा कडाका आणखी एक ते दोन दिवस असाच राहू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. पण आणखी थंडी वाढण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये काल 0.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पिकांवरचे दवबिंदूही गोठले आहेत. तर नाशिक शहरात 2.8 डिग्री सेल्सियसची नोंद झाली, यंदाच्या वर्षी मुंबईत 14 डिग्री सेल्सियसचा पारा गाठला आहे. तर परभणीमध्ये तापमान 7 डिग्री, नागपूरमध्ये 17 तर रत्नागिरीमध्येही 17 डिग्रीजची नोंद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 02:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading