बंडोबा पेटले, पक्ष गडबडले !

बंडोबा पेटले, पक्ष गडबडले !

31 जानेवारीमहापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आज संध्याकाळी 5 वाजता संपली आहेत. पण आजचा दिवसही गाजला तो बंडखोरांमुळेच...बंडखोरांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात दंड धोपटल्यानं सर्वचं पक्षात प्रचंड घबराट उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळुन येण्याचे प्रमुख कारणं ठरलं ते घराणेशाही आणि आर्थिक ताकदीवर मिळणारी उमेदवारी...बंडखोर.. बंडखोर.. बंडखोर.. सर्व पक्षांत.. सर्व शहरांत बंडखोर. पण स्वकीयांच्या नाराजीचा सर्वांत मोठ फटका बसू शकतो तो मुंबईतल्या काँग्रेसला. महाआघाडीच्या जागावाटपामुळे आणि नंतर तिकीट वाटपामुळे.. आधीच गटातटात विभागलेली मुंबई काँग्रेस आता जास्त खिळखिळी झाली आहे. माहीम मीना देसाई, चारकोपचे कमलेश यादव, भांडुपचे महेश पवार, कांजूरच्या प्रमिला पाटील आणि सर्वानंद पांडियन हे सर्व बंडखोरी करणार आहे. अजित सावंत यांनी तर आता तिकीट वाटपात थेट आर्थिक सौदेबाजी झाल्याचा आरोप केला आहे.शिवसेनेला ठाण्यात आणि मुंबईत मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये नाराजांनी सेनेच्या कार्यलयाबाहेर घोषणाबाजी केली. मुंबईत घाटकोपरमध्ये राजा चौगुले, अँटॉप हिलमध्ये मंगेश सातमकर, मुलुंडमध्ये राम तोंडवलकर आणि परळमध्ये दत्ता घाटकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या तीन माजी महापौरांनी बंडखोरीचं निशाण फडकवलं. शेवंताबाई पवार, पुरणचंद्र पंजाल आणि संजय हेमगड्डी या तिघांना तिकीट नाकारल्यांन त्यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज भरलाय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 3 विद्यमान आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलंय. यात स्थायी समितीचे सभापती रणजित नगरकर यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी आणि भाजपध्येही बंडखोरी होत असली. तरी सगळ्यात जास्त फटका शिवसेना आणि काँग्रेसला मुंबईत बसण्याची शक्यता आहे. नात्यांमुळे पक्ष गोत्यातघराणेशाहीच्या नावाने शंख करणार्‍या सगळ्याच पक्षांनी उमेदवारी देताना घराणेशाहीलाच प्राधान्य दिलं आहे. त्यातच ज्यांची आर्थिक परिस्थिती उदंड आहे त्यांना किंवा त्यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना- अभिषेक घोसाळकरआमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा- यामिनी जाधवमाजी नगरसेवक यशवंत जाधव यांची पत्नीमाजी नगरसेवक दिलीप शिंदे यांची पत्नी प्रमिला शिंदे- माजी बेस्ट अध्यक्ष संजय पोतनीस यांची पत्नी सुनयना पोतनीसभाजपमुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांची सून - हेमा पुरोहितकाँग्रेस- आमदार राजहंस सिंग यांचा मुलगा रितेश सिंग- नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर- आमदार कालिदास कोळंबकर यांचा मुलगा प्रथमेश कोळंबकरराष्ट्रवादी काँग्रेस- मंत्री सचिन अहिर यांचा भाऊ सुनील अहिर- नवाब मलिक यांची बहीण सईदा खान - नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिकमनसे- आमदार प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकरसर्वचं राजकीय पक्ष हे घराणेशाहीच्या जोरावर वाढलेले दिसतात. त्यामुळे जवळचे नेते आणि त्याच्या वारसदारांना डावलणं पक्षश्रेष्ठींना जड गेलं आहे. त्यातच इलेक्टीव्ह मेरीटचा कितीही आव आणला तरी आर्थिक हितसंबंधातल्या लोकांचीच वर्णी उमेदवार यादीत लागलेली दिसते. त्यामुळेचं बंडोबांनी बहुतांश ठिकाणी बंडाचं निषाणं फडकावलं आहे. तिकीट वाटपात घराणेशाही आणि आर्थिक ताकदच महत्वाची ठरतेय. मुंबईत प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. पक्षासाठी काम करणार्‍या डावललेल्या कार्यकर्त्यांचा आवाज बंडखोरांच्या रूपानं ऐकायला मिळत आहे.

  • Share this:

31 जानेवारीमहापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आज संध्याकाळी 5 वाजता संपली आहेत. पण आजचा दिवसही गाजला तो बंडखोरांमुळेच...बंडखोरांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात दंड धोपटल्यानं सर्वचं पक्षात प्रचंड घबराट उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळुन येण्याचे प्रमुख कारणं ठरलं ते घराणेशाही आणि आर्थिक ताकदीवर मिळणारी उमेदवारी...बंडखोर.. बंडखोर.. बंडखोर.. सर्व पक्षांत.. सर्व शहरांत बंडखोर. पण स्वकीयांच्या नाराजीचा सर्वांत मोठ फटका बसू शकतो तो मुंबईतल्या काँग्रेसला. महाआघाडीच्या जागावाटपामुळे आणि नंतर तिकीट वाटपामुळे.. आधीच गटातटात विभागलेली मुंबई काँग्रेस आता जास्त खिळखिळी झाली आहे. माहीम मीना देसाई, चारकोपचे कमलेश यादव, भांडुपचे महेश पवार, कांजूरच्या प्रमिला पाटील आणि सर्वानंद पांडियन हे सर्व बंडखोरी करणार आहे. अजित सावंत यांनी तर आता तिकीट वाटपात थेट आर्थिक सौदेबाजी झाल्याचा आरोप केला आहे.

शिवसेनेला ठाण्यात आणि मुंबईत मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये नाराजांनी सेनेच्या कार्यलयाबाहेर घोषणाबाजी केली. मुंबईत घाटकोपरमध्ये राजा चौगुले, अँटॉप हिलमध्ये मंगेश सातमकर, मुलुंडमध्ये राम तोंडवलकर आणि परळमध्ये दत्ता घाटकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय.

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या तीन माजी महापौरांनी बंडखोरीचं निशाण फडकवलं. शेवंताबाई पवार, पुरणचंद्र पंजाल आणि संजय हेमगड्डी या तिघांना तिकीट नाकारल्यांन त्यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज भरलाय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 3 विद्यमान आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलंय. यात स्थायी समितीचे सभापती रणजित नगरकर यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी आणि भाजपध्येही बंडखोरी होत असली. तरी सगळ्यात जास्त फटका शिवसेना आणि काँग्रेसला मुंबईत बसण्याची शक्यता आहे.

नात्यांमुळे पक्ष गोत्यात

घराणेशाहीच्या नावाने शंख करणार्‍या सगळ्याच पक्षांनी उमेदवारी देताना घराणेशाहीलाच प्राधान्य दिलं आहे. त्यातच ज्यांची आर्थिक परिस्थिती उदंड आहे त्यांना किंवा त्यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेना- अभिषेक घोसाळकरआमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा- यामिनी जाधवमाजी नगरसेवक यशवंत जाधव यांची पत्नीमाजी नगरसेवक दिलीप शिंदे यांची पत्नी प्रमिला शिंदे- माजी बेस्ट अध्यक्ष संजय पोतनीस यांची पत्नी सुनयना पोतनीसभाजपमुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांची सून - हेमा पुरोहित

काँग्रेस- आमदार राजहंस सिंग यांचा मुलगा रितेश सिंग- नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर- आमदार कालिदास कोळंबकर यांचा मुलगा प्रथमेश कोळंबकर

राष्ट्रवादी काँग्रेस- मंत्री सचिन अहिर यांचा भाऊ सुनील अहिर- नवाब मलिक यांची बहीण सईदा खान - नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिकमनसे- आमदार प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर

सर्वचं राजकीय पक्ष हे घराणेशाहीच्या जोरावर वाढलेले दिसतात. त्यामुळे जवळचे नेते आणि त्याच्या वारसदारांना डावलणं पक्षश्रेष्ठींना जड गेलं आहे. त्यातच इलेक्टीव्ह मेरीटचा कितीही आव आणला तरी आर्थिक हितसंबंधातल्या लोकांचीच वर्णी उमेदवार यादीत लागलेली दिसते. त्यामुळेचं बंडोबांनी बहुतांश ठिकाणी बंडाचं निषाणं फडकावलं आहे.

तिकीट वाटपात घराणेशाही आणि आर्थिक ताकदच महत्वाची ठरतेय. मुंबईत प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. पक्षासाठी काम करणार्‍या डावललेल्या कार्यकर्त्यांचा आवाज बंडखोरांच्या रूपानं ऐकायला मिळत आहे.

First published: January 31, 2012, 3:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading