मुंबई, 12 मार्च : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. पण आता याबाबत मातोश्रीवरून ठाकरे घराण्यातीलच एका व्यक्तीने या वृत्ताचं खंडन केलं आहे. 'आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत,' असं मातोश्रीवरून सांगण्यात आलं आहे.
'आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळतील. राज्यभरातील मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेना उमेदवारांचा प्रचार करतील. त्यामुळे ते निवडणुकीला उभे राहतील या चर्चा निरर्थक आहेत,' अशी प्रतिक्रिया ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीने 'न्यूज18 लोकमत'कडे दिली आहे.
काय होती चर्चा?
'आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे', अशी बातमी एका मराठी वृत्तपत्राने दिली होती. 'आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते,' असंही या वृत्तात म्हणण्यात आलं होतं.
VIDEO : सेनेत दाखल झाल्यानंतर शरद सोनवणे राज ठाकरेंबद्दल म्हणतात...