VIDEO: भारताची वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक; चेतन शर्माने केली होती कमाल! Chetan Sharma | Hat Trick | Cricket | World Cup

VIDEO: भारताची वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक; चेतन शर्माने केली होती कमाल! Chetan Sharma | Hat Trick | Cricket | World Cup

1987च्या वर्ल्डकपमध्ये सर्वांना धक्का देत चेतन शर्म यांनी हॅट्ट्रिक घेतली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून: 1987मध्ये सर्व प्रथम इंग्लंडच्या बाहेर खेळवण्यात आला होता. तसेच हा पहिला वर्ल्डकप होता ज्यात 50-50 षटकांचा सामना होणार होता. स्पर्धेत भारताने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला होता. 31 ऑक्टोबर 1987 रोजी नागपूरमध्ये भारताचा सहावा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 41 षटकात 5 बाद 182 धावा केल्या होत्या. केन रदरफोर्ड 26 धावांवर खेळत होते. भारताचे नेतृत्व कपील देव करत होता.

या सामन्यात भारताकडे 3 मुख्य गोलंदाज होते. त्यापैकी मुख्य जलद गोलंदाज मनोज प्रभाकरचे 5 षटके शिल्लक होते. पण कपील देवने कमी अनुभव असलेल्या आणि पहिल्या 5 षटकात अत्यंत महाग ठरलेल्या चेतन शर्माकडे चेंडू दिला. 42व्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवर न्यूझीलंडला एकही रन घेता आली नाही. पण त्यानंतरच्या 3 चेंडूत जे काही झाले त्यासाठी चेतन शर्मा ओळखले जातात. चौथा चेंडू शर्माने ऑफ कटर टाकला आणि रुदरफोर्ड यांनी तो बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण ते बोल्ड झाले. रुदरफोर्डच्या जागी आक्रमक फलंदाज इयान स्मिथ मैदानात दाखल झाले. शर्माने पाचवा चेंडू इन कटर टाकला. या चेंडूने शर्मा यांना चकवा दिला आणि त्यांची बोल्ड उडाली. दुसऱ्या विकेटमुळे शर्मा यांच्याकडे इतिहास घडवण्याची संधी होती. संपूर्ण देशाचे लक्ष शर्मा यांच्यावर होते.

World Cup : शमीची हॅट्ट्रिक तरीही बुमराहने पटकावला सामनावीरचा पुरस्कार!

स्मिथ बाद झाल्यानंतर हॅट्ट्रिकचा चेंडूला समारे जाण्यासाठी एव्हेन चॅटफील्ड मैदानात आले. षटकातील अखेरचा चेंडू टाकण्याआधी शर्मा आणि कर्णधार कपील देव यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यानंतर शर्मा यांनी सहावा चेंडू फुल लेंथ टाकला तो खेळण्यासाठी चॅटफील्ड अक्रॉस आले आणि त्यांची बोल्ड उडाली. चेतन शर्मा यांनी भारताकडून वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले गोलंदाज ठरले होते. विशेष म्हणजे हॅट्ट्रिक घेताना शर्मा यांनी स्टंपच्या ऑफ, मिडल आणि लेग अशा तिन्ही स्टंप पाडल्या.

सामनावीर पुरस्कार विभागून दिला...

चेतन शर्माच्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडची अवस्था 5 विकेट 182वरून 8 विकेट 182 अशा झाली.  50 षटकात त्यांनी 221 धावा केल्या. त्यानंतर भारताकडून सुनील गावसकर यांनी कमाल केली. त्यांनी 88 चेंडूत 103 धावा केल्या. गावसकर यांचे वनडेतील हे पहिले शतक होय. त्यांना श्रीकांत (58 चेंडूत 75 धावा) आणि अझरुद्दीन (51 चेंडूत 41 धावा) यांनी साथ दिली. भारताने हा सामना 32.1 षटकात 1 विकेटच्या बदल्यात जिंकला. हॅट्ट्रिक घेणाऱ्या चेतन शर्मा आणि सुनील गावसकर यांना सामनावीर पुरस्कार विभागून देण्यात आला.

VIDEO: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

First published: June 23, 2019, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading