Elec-widget

विठ्ठलाच्या मूर्तीवर 'इपॉक्सी कोटिंग'वादात

विठ्ठलाच्या मूर्तीवर 'इपॉक्सी कोटिंग'वादात

सुनील उंबरे, पंढरपूर15 जानेवारीपंढरपुरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीवर उद्यापासून इपॉक्सी कोटिंग देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना पुढचे 12 दिवस विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. पण इपॉक्सी या प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ही प्रक्रिया केल्यामुळे मूर्तीचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होईल असं पुरातत्व विभागातल्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंदिर समिती आणि बडवे हे स्वार्थासाठी मूर्तीला इजा पोचवतायत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विठुरायाच्या या लोभस रुपाचं दर्शन पुढचे 12 दिवस घेता येणार नाही. कारण 300 वर्षं जुन्या या मूर्तीची झीज रोखण्यासाठी तिच्यावर तिसर्‍यांदा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणारे आहे. मंदिर समितीने निमंत्रित केलेल्या डॉ देगलूरकर, चिडगूपकर आणि राजगुरू यांनी आपल्या अहवालात म्हटलंय की इपॉक्सी ही प्रक्रिया केल्यानंतर मूर्तीवर दररोज अभिषेक करणं शक्य आहे. पण औरंगाबादमध्ये असलेल्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने यापूर्वीच सांगितलं होतं की अभिषेक करणं विठ्ठलाच्या मूर्तीसाठी हानिकारक आहे. आता सुरू होत असलेली इपॉक्सीची प्रक्रिया केली तर मूर्ती दुभंगू शकते असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. काया ही झिजली- वालुकामय दगडापासून बनलेल्या मूर्तीचं वर्षाकाठी 1 कोटी भाविक हात, डोकं लावून दर्शन घेतलात- अनेक वर्षांपासून मूर्तीवर दिवसांतून 6 वेळा महापूजा केली जाते- प्रत्येक महापूजेच्या वेळी दही, दूध, लिंबू, मध, साखर यांनी अभिषेक केला जातो- यांमुळे होत असलेली झीज थांबवण्यासाठी 1987 साली मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला- 2005 साली सिलिकॉनचा वापर करून पुन्हा रासायनिक प्रक्रिया केली गेलीपुरातत्व विभागाच्या मते एक उत्सव मूर्ती स्थापन करून त्यावर अभिषेक करण्यात यावा. तसेच पदस्पर्शही उत्सव मूर्तीला करण्यात यावा. वारकरीही अभिषेक आणि महापूजेबद्दल आग्रही नाही. मूर्ती टिकणं महत्त्वाचं, अशी त्यांची भूमिका. पण सर्वांचा आक्षेप असतानाही मंदिर समितीचा आग्रह आहे की रासायनिक प्रक्रिया करून मुळ मूर्तीवरच अभिषेक करायला हवा. प्रत्येक महापूजा आणि अभिषेकासाठी मंदिर समितीला आणि बडव्यांना काही 2 लाखांपर्यंत रुपये मिळतात. त्यामुळे मंदिर समिती तात्पुरत्या आर्थिक नफ्यासाठी विठुरायाच्या मूर्तीला संकटात टाकतायत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

सुनील उंबरे, पंढरपूर15 जानेवारी

पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीवर उद्यापासून इपॉक्सी कोटिंग देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना पुढचे 12 दिवस विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. पण इपॉक्सी या प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ही प्रक्रिया केल्यामुळे मूर्तीचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होईल असं पुरातत्व विभागातल्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंदिर समिती आणि बडवे हे स्वार्थासाठी मूर्तीला इजा पोचवतायत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विठुरायाच्या या लोभस रुपाचं दर्शन पुढचे 12 दिवस घेता येणार नाही. कारण 300 वर्षं जुन्या या मूर्तीची झीज रोखण्यासाठी तिच्यावर तिसर्‍यांदा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणारे आहे. मंदिर समितीने निमंत्रित केलेल्या डॉ देगलूरकर, चिडगूपकर आणि राजगुरू यांनी आपल्या अहवालात म्हटलंय की इपॉक्सी ही प्रक्रिया केल्यानंतर मूर्तीवर दररोज अभिषेक करणं शक्य आहे.

पण औरंगाबादमध्ये असलेल्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने यापूर्वीच सांगितलं होतं की अभिषेक करणं विठ्ठलाच्या मूर्तीसाठी हानिकारक आहे. आता सुरू होत असलेली इपॉक्सीची प्रक्रिया केली तर मूर्ती दुभंगू शकते असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

काया ही झिजली- वालुकामय दगडापासून बनलेल्या मूर्तीचं वर्षाकाठी 1 कोटी भाविक हात, डोकं लावून दर्शन घेतलात- अनेक वर्षांपासून मूर्तीवर दिवसांतून 6 वेळा महापूजा केली जाते- प्रत्येक महापूजेच्या वेळी दही, दूध, लिंबू, मध, साखर यांनी अभिषेक केला जातो- यांमुळे होत असलेली झीज थांबवण्यासाठी 1987 साली मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला- 2005 साली सिलिकॉनचा वापर करून पुन्हा रासायनिक प्रक्रिया केली गेलीपुरातत्व विभागाच्या मते एक उत्सव मूर्ती स्थापन करून त्यावर अभिषेक करण्यात यावा. तसेच पदस्पर्शही उत्सव मूर्तीला करण्यात यावा. वारकरीही अभिषेक आणि महापूजेबद्दल आग्रही नाही. मूर्ती टिकणं महत्त्वाचं, अशी त्यांची भूमिका. पण सर्वांचा आक्षेप असतानाही मंदिर समितीचा आग्रह आहे की रासायनिक प्रक्रिया करून मुळ मूर्तीवरच अभिषेक करायला हवा.

प्रत्येक महापूजा आणि अभिषेकासाठी मंदिर समितीला आणि बडव्यांना काही 2 लाखांपर्यंत रुपये मिळतात. त्यामुळे मंदिर समिती तात्पुरत्या आर्थिक नफ्यासाठी विठुरायाच्या मूर्तीला संकटात टाकतायत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2012 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...