Elec-widget

लोकलवर दगडफेकीत पोलीस हवालदाराचा मृत्यू

लोकलवर दगडफेकीत पोलीस हवालदाराचा मृत्यू

04 जानेवारीनवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्टेशन परिसरात काम करणार्‍या दीपक जाधव या पोलीस कर्मचार्‍याचा रेल्वेतून प्रवास करताना दगड लागून दुदैर्वी मृत्यू झाला. 2 जानेवरीला संध्याकाळी कामावरून घरी जाताना ही घटना घडली. दीपक जाधव पनवेल लोकल पकडून कामोठेला उतरणार होते. पण सीवूड रेल्वे स्टेशनसोडून ट्रेन पुढे निघाली आणि अचानक एक दगड दीपक जाधव यांच्या डोक्याला लागला. अतिशय वेगाने आलेला दगडाचा जोरदार फटका डोक्याला लागल्याने जाधव गंभीर जखमी झाले.त्यांना सीबीडीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. म्हणून त्यांना वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरीही तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांचं वय 27 वर्ष असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत रेल्वे प्रवाश्यांवर दगड फेकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. प्रामुख्याने पश्चिम उपनगारातील वांद्रे, सांताक्रुझ, खार, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या स्टेशन परिसरात. तर मध्यरेल्वेवरील सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुंलुंड, कळवा, मुंब्रा या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या झोपडपट्यांनमधून प्रवाश्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. तसेच हार्बर रेल्वे लाईनवर वडाळा, जीटीबी नगर, चुनाभट्टी, कुर्ला, चेंबुर, गोवंडी, मानखुर्द या परिसरातील झोपडपट्यांमधून प्रवाश्यांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्यात. रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनच्या जवळ असलेल्या झोपड्यांमधून दगड रेल्वे प्रवाश्यांवर भिरकावले जातात.

  • Share this:

04 जानेवारी

नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्टेशन परिसरात काम करणार्‍या दीपक जाधव या पोलीस कर्मचार्‍याचा रेल्वेतून प्रवास करताना दगड लागून दुदैर्वी मृत्यू झाला. 2 जानेवरीला संध्याकाळी कामावरून घरी जाताना ही घटना घडली. दीपक जाधव पनवेल लोकल पकडून कामोठेला उतरणार होते. पण सीवूड रेल्वे स्टेशनसोडून ट्रेन पुढे निघाली आणि अचानक एक दगड दीपक जाधव यांच्या डोक्याला लागला. अतिशय वेगाने आलेला दगडाचा जोरदार फटका डोक्याला लागल्याने जाधव गंभीर जखमी झाले.

त्यांना सीबीडीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. म्हणून त्यांना वाशीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तरीही तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांचं वय 27 वर्ष असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत रेल्वे प्रवाश्यांवर दगड फेकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. प्रामुख्याने पश्चिम उपनगारातील वांद्रे, सांताक्रुझ, खार, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या स्टेशन परिसरात. तर मध्यरेल्वेवरील सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुंलुंड, कळवा, मुंब्रा या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या झोपडपट्यांनमधून प्रवाश्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. तसेच हार्बर रेल्वे लाईनवर वडाळा, जीटीबी नगर, चुनाभट्टी, कुर्ला, चेंबुर, गोवंडी, मानखुर्द या परिसरातील झोपडपट्यांमधून प्रवाश्यांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्यात. रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनच्या जवळ असलेल्या झोपड्यांमधून दगड रेल्वे प्रवाश्यांवर भिरकावले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...