पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा, अखेर पवारांच्या बैठकीत झाला अंतिम निर्णय

पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा, अखेर पवारांच्या बैठकीत झाला अंतिम निर्णय

मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशातच आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पार्थला उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत आहे. त्यामुळेच मग पक्षाकडून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आहे,

पार्थ पवार आणि मावळ मतदारसंघ

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली.

मावळ लोकसभा मतदारसंघात येणार विधानसभा मतदारसंघ

पनवेल

कर्जत

उरण

मावळ

चिंचवड

पिंपरी

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 9, 2019, 12:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading