अण्णांच्या आंदोलनाकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ

अण्णांच्या आंदोलनाकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ

28 डिसेंबरसक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचे मुंबईत वांद्रे-कुर्ला संकूल येथे उपोषण सुरु आहे. दिल्ली येथे झालेल्या या अगोदरच्या आंदोलनाला गर्दी पाहता मुंबईतील आंदोलनाला गर्दीचे 'कुपोषण' लागले आहे. मैदानावर जेमतेम 3 ते 5 हजार लोकांचीच गर्दी पाहण्यास मिळाली. काल संध्याकाळी मात्र लोकांची गर्दी वाढली पण दिवसभरातला आकडा 15 ते 20 हजार गाठू शकला. या आंदोलनाला मोठ्याप्रमाणावर गर्दी होईल अशी अपेक्षा होती मात्र साफ फोल ठरली. काल निघालेल्या वाहन रॅलीतही मोजक्याच वाहनांचा ताफा सोबत होता. मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टाने संसदेत लोकपालवर चर्चा सुरु आहे त्यामुळे अण्णांनी उपोषण का करत आहे असा सवाल टीम अण्णांना केला होता. समाजातील अनेक स्तारातून हात प्रश्न विचारला जात होता. मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम होते. आज उपोषणाचा दुसर्‍यादिवशी अण्णांची प्रकृती आणखी ढासळली आहे त्यामुळे अण्णांनी उपोषण सोडावे अशी मागणी डॉक्टर आणि राळेगणवासी करत आहे. आज संध्याकाळपर्यंत अण्णा उपोषण सोडतील अशी शक्यता आहे.

  • Share this:

28 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचे मुंबईत वांद्रे-कुर्ला संकूल येथे उपोषण सुरु आहे. दिल्ली येथे झालेल्या या अगोदरच्या आंदोलनाला गर्दी पाहता मुंबईतील आंदोलनाला गर्दीचे 'कुपोषण' लागले आहे. मैदानावर जेमतेम 3 ते 5 हजार लोकांचीच गर्दी पाहण्यास मिळाली. काल संध्याकाळी मात्र लोकांची गर्दी वाढली पण दिवसभरातला आकडा 15 ते 20 हजार गाठू शकला. या आंदोलनाला मोठ्याप्रमाणावर गर्दी होईल अशी अपेक्षा होती मात्र साफ फोल ठरली. काल निघालेल्या वाहन रॅलीतही मोजक्याच वाहनांचा ताफा सोबत होता. मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टाने संसदेत लोकपालवर चर्चा सुरु आहे त्यामुळे अण्णांनी उपोषण का करत आहे असा सवाल टीम अण्णांना केला होता. समाजातील अनेक स्तारातून हात प्रश्न विचारला जात होता. मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम होते. आज उपोषणाचा दुसर्‍यादिवशी अण्णांची प्रकृती आणखी ढासळली आहे त्यामुळे अण्णांनी उपोषण सोडावे अशी मागणी डॉक्टर आणि राळेगणवासी करत आहे. आज संध्याकाळपर्यंत अण्णा उपोषण सोडतील अशी शक्यता आहे.

First published: December 28, 2011, 10:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading