'अण्णा हट्ट धरु नका, उपोषण सोडाच'

'अण्णा हट्ट धरु नका, उपोषण सोडाच'

28 डिसेंबरअण्णा हजारे यांनी आता उपोषण सोडायलाच हवं, नाहीतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतील, असं स्पष्ट मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी अण्णांच्या प्रकृतीत चढउतार होताना दिसत आहे. उपोषण सुरु करण्याच्या आधीपासूनच 3 दिवस अण्णा आजारी होते. पण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याने त्यांनी आंदोलन सुरु केलं. कालही अण्णांची तब्येत ढासळली होती. आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवली, त्याचबरोबर अण्णांना थकवाही जाणवतोय . शरीरातलं सोडीयमही कमी झालं आहे. उपोषण सुरू राहिल्यास किडणीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्यांचा रक्तदाब सध्या नॉर्मल असला, तरी उभं राहिल्यावर मात्र तो कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सोडायलाच हवं, असं आग्रही मत डॉ. अश्विन मेहता आणि डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

28 डिसेंबर

अण्णा हजारे यांनी आता उपोषण सोडायलाच हवं, नाहीतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतील, असं स्पष्ट मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी अण्णांच्या प्रकृतीत चढउतार होताना दिसत आहे. उपोषण सुरु करण्याच्या आधीपासूनच 3 दिवस अण्णा आजारी होते. पण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याने त्यांनी आंदोलन सुरु केलं. कालही अण्णांची तब्येत ढासळली होती. आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवली, त्याचबरोबर अण्णांना थकवाही जाणवतोय . शरीरातलं सोडीयमही कमी झालं आहे. उपोषण सुरू राहिल्यास किडणीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्यांचा रक्तदाब सध्या नॉर्मल असला, तरी उभं राहिल्यावर मात्र तो कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सोडायलाच हवं, असं आग्रही मत डॉ. अश्विन मेहता आणि डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं आहे.

First published: December 28, 2011, 8:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading