'मुंबई में माफिया नागपूर में माफ किया', उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

'मुंबई में माफिया नागपूर में माफ किया', उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

  • Share this:

uddhav_thackery09 फेब्रुवारी : 'मुंबई में माफिया नागपूर में माफ किया' अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. युती तुटली आणि मी सुटलो. नाहीतर मोदी शहा आणि पप्पू कलानीसोबत माझाही फोटो होर्डिंगवर लागला असता असा टोलाही त्यांनी लगावला. मोदी दोन वर्षांपासून चामड्याचे बुडबुडे सोडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांची आज अंधेरी येते सभा पार पडली. उल्हासनगरमध्ये भाजपच्या बॅनर पाहून सुटलो असं वाटलं. युती तोडली नसती तर कलानी, मोदी आणि शाह सोबत माझाही फोटो लागला असता. युती का तोडली? परिवर्तन तर होणारच असे सगळीकडे पोस्टर पाहतोय. आता तर साधू संत, अडवाणी बाजूला गेले आणि कलानी स्टेजवर दिसायला लागले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काही झालं तरी मुख्यमंत्री बरा असावा, तिळगुळ न घेता गोड गोड बोलता. पण मुंबईची तुलना पटण्याशी करतांना लाज नाही वाटत, शरम नाही वाटत? यांचे दात घशात गेले तरी म्हणतात. दात आहेत. यांचे दात ही पारदर्शी आहेत वाटतं. ज्या नागपुरातून आपले मुख्यमंत्री आले त्या नागपूरचा या अहवालात  साधा उल्लेख ही नाही. पाटनाचा उल्लेख आहे पण माझ्या उप राजधानीचा उल्लेख नाही.नागपुरात तर मुख्यमंत्री महापौर होते, तेव्हा कुठली चौकशी सुरू होती. ते ही पारदर्शकपणे सांगावं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

अभिमानाने मी कामं घेऊन आलोय. मात्र तुम्ही हे नाकारताय.

मुंबई महापालिकेतील ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर नागपूरमध्ये मेट्रो आणि रस्त्याची कामं करतायत. म्हणजे इथे माफिया आणि तिथे माफ किया? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि किरीट सोमय्यांना लगावला.

शिवरायांच्या नावाने आम्ही खंडणी मागत नाही. शिवराय आमचे दैवत आहे.  तुमच्यासारखे प्रचारापुरता शिवरायांचा फोटो नाही वापरत नाही. तुम्ही कधी शिवजयंती तरी साजरी केलीत का?  शिवरायांच्या नावाने खंडणी मागण्याचे आरोप करतात आणि पप्पू कलानी सोबत फिरता अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 9, 2017, 10:25 PM IST

ताज्या बातम्या