संजय लीला भन्साळींवर आली 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट तोडण्याची वेळ, वाचा काय आहे कारण

संजय लीला भन्साळींवर आली 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट तोडण्याची वेळ, वाचा काय आहे कारण

आलिया भट्टचा बहुचर्चित सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट तोडण्याचे आदेश संजय लीला भन्साळी यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असणारा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiyawadi) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) मुळे ज्या चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे त्यापैकी आलियाचा हा चित्रपट देखील आहे. अशावेळी अशी माहिती मिळते आहे की गंगूबाईचा हा सेट तोडला जाऊ शकतो. देशामध्ये वाढवण्यात आलेला लॉकडाऊन लक्षात घेता चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

(हे वाचा-VIDEO: दीपिका समजून बाथरूमध्ये अंघोळ करणाऱ्या तिच्या आईशी केलं रणबीरने फ्लर्ट)

'गंगूबाई काठियावाडी'चा सेट तोडण्याचे आदेश भन्साळी यांनी प्रोडक्शन टीमला दिल्याची माहिती मिळत आहे. गंगूबाईचा सेट म्हणजे 1960च्या संपूर्ण कामाठीपुरा उभारण्यात आला होता. या सेटसाठी द्याव्या लागणाऱ्या भाड्याच्या खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे.

मिड डेने दिलेल्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी यांनी सेटच्या मेंटेनन्सचे पैसे भरले होते. पण लॉकडाऊनमुळे त्याठिकाणी शूटिंग होत नाही आहे. त्यामुळे भन्साळी यांनी तो सेट तोडण्याचे आदेश दिले आहेत. कारण त्या सेटचं भाडं आणि मेंटेनन्स देणं सेट पुन्हा बनवण्यापेक्षा महाग आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

(हे वाचा-सलमान खानकडून राष्ट्रवादी नेत्याच्या फिटनेसचं कौतुक, VIDEO पाहून व्हाल थक्क)

यामध्ये आलिया गँगस्टर गंगूबाईची भूमिका साकारणार आहे. आलियासाठी ही वेगळी आणि चॅलेंजिंग भूमिका असणारआहे. त्याचप्रमाणे भन्साली बॅनरखाली सुद्धा आलिया प्रथमच काम करते आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 23, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading