'पंजा'ला 'कमळाबाई'ची मदत, धनंजय मुंडेंचा आरोप

'पंजा'ला 'कमळाबाई'ची मदत, धनंजय मुंडेंचा आरोप

  • Share this:

munde_5345309 फेब्रुवारी :  काँग्रेस आणि भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. अहमदनगरच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केलाय. काँग्रेसच्या हातात भाजपचं कमळ असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पंजाला कमळाबाईची मदत असल्याचं त्यांच्या खास शैलीत टीका केलीये. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या घराणेशाहीवरही टीका केलीये.

अहमदनगरला ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. अच्छे दिन, नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराचा त्यांनी पर्दाफाश केलाय. तर काँग्रेस आणि भाजपची फिक्सिंग असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. नोटबंदीच्या काळात जनता दहा तास रांगेत उभी होती. मात्र एकही काळा पैसेवाला रांगेत दिसला नाही. मोदींनी काळ्या पैसेवाल्यांना बँकांतून घरपोच पैसा बदलून दिला. हा तुमचा अपमान असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.

तसंच शिक्षण, आरोग्य, आदिवासी, महिला बालकल्याण खात्यात भ्रष्टाचार झाला मात्र मुख्यमंत्री क्लीन चिट देत असल्याचा आरोप मुंडेंनी केलाय. भ्रष्टाचाराचे पुरावे खोटे असल्यास फाशी द्या,  पुरावे खरे असल्यास एक दिवस खुर्चीवर बसू नका, असं अवाहनही त्यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 9, 2017, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading