इंदू मिलमधील आंदोलकांना बाहेर काढा : हायकोर्ट

22 डिसेंबरइंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी मिलमध्ये ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना काही करुन बाहेर काढा असा इशारा मंुबईत हायकोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला. यासाठी कोर्टाने राज्य सरकारला 1 आठवड्याचा कालावधी दिला आहे. या काळात आंदोलकांसोबत वाटाधाटी पूर्ण करा नाहीतर बळाचा वापर करून आंदोलकांना हुसकावून लावा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. 6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो भीमसैनिकांनी मिलमध्ये घुसखोरीकरुन मिलचा ताबा घेतला. जोपर्यंत मिलचा संपूर्ण ताबा देण्यात येत नाही तोपर्यंत मिल सोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. मध्यंतरी रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी थेट मिलवर हल्ला चढवला आणि मिलमध्ये जाळपोळ आणि तोडफोड केली. याप्रकरणी मुंबई उच्चन्यायालयात या जागेची मालकी असलेल्या एनटीसीनं याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी देत न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. आंदोलकांवर कारवाईनं करणे म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात का आली नाही असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. आज याचिकेवर दुसर्‍यांदा सुनावणी झाली. यावेळी काही करुन आंदोलकांना बाहेर काढा असा इशारा सरकारला दिला. यासाठी कोर्टाने 1 आठवड्याची मुदत दिली आहे. दरम्यान, यावेळी कोर्टाबाहेर आणि आत प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला. इंदू मिलबाबत सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होण्याची शक्यता असल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2011 09:42 AM IST

इंदू मिलमधील आंदोलकांना बाहेर काढा : हायकोर्ट

22 डिसेंबर

इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी मिलमध्ये ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना काही करुन बाहेर काढा असा इशारा मंुबईत हायकोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला. यासाठी कोर्टाने राज्य सरकारला 1 आठवड्याचा कालावधी दिला आहे. या काळात आंदोलकांसोबत वाटाधाटी पूर्ण करा नाहीतर बळाचा वापर करून आंदोलकांना हुसकावून लावा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे.

6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो भीमसैनिकांनी मिलमध्ये घुसखोरीकरुन मिलचा ताबा घेतला. जोपर्यंत मिलचा संपूर्ण ताबा देण्यात येत नाही तोपर्यंत मिल सोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. मध्यंतरी रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी थेट मिलवर हल्ला चढवला आणि मिलमध्ये जाळपोळ आणि तोडफोड केली. याप्रकरणी मुंबई उच्चन्यायालयात या जागेची मालकी असलेल्या एनटीसीनं याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी देत न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. आंदोलकांवर कारवाईनं करणे म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात का आली नाही असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. आज याचिकेवर दुसर्‍यांदा सुनावणी झाली. यावेळी काही करुन आंदोलकांना बाहेर काढा असा इशारा सरकारला दिला. यासाठी कोर्टाने 1 आठवड्याची मुदत दिली आहे. दरम्यान, यावेळी कोर्टाबाहेर आणि आत प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला. इंदू मिलबाबत सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होण्याची शक्यता असल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...