ताडोबा राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद

19 नोव्हेंबर नागपूरकल्पना नळसकर वाघांच्या संवर्धनासाठी हॉट स्पॉट ठरलेला महाराष्ट्राचा प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात येणार आहे. इथे येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. पण हा व्याप सांभाळण्यासाठी वन विभागाकडे कर्मचारी नाहीत हे त्यामागचं कारण आहे, असं वन विभागातर्फे सांगितलं जातं. ताडोबातली यंत्रणा पार कोलमडली आहे. वन विभागाच्या व्यवस्थेत रेंज फॉरेस्ट ऑफिसर हे पद महत्त्वाच असतं. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात अशी महत्त्वाची पदं भरलीच गेलेली नाहीत. जोपर्यंत ही पदं भरली जात नाही तोपर्यत हे अभयारण्य सुरूहोणार नाही, असं वनविभागाच्या अधिका-यांचं म्हणणं आहे. अपु-या कर्मचा-यांमुळे आता हा ताडोबा नॅशनल पार्क बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. गेल्यावर्षी सुमारे 61 हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली . निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी साधारणत: दिवसाला दोनशे पर्यटक येथे येतात.येत्या 21 नोव्हेंबर पासून ताडोबा नॅशनल पार्क बंद होणार आहे. त्यामुळे आता एकही वाघ पाहायला मिळणार नाही. ताडोबा राष्ट्रीय अभयारण्याचा व्याप सांभाळण्यासाठी पाच अधिका-यांची पदे मंजूर आहेत. पण त्यापैकी तीन पदे अजून रिक्त आहेत.ताडोबात सध्या दोन कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत.मंजूर झालेला निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे. राष्ट्रीय उद्यानाचे दैनंदिन कामे आणि प्राण्यांच्या संरक्षणाचे कामाचा निधीही यातआहे. त्यामुळे जो पर्यत ही पदं भरली जात नाही तोपर्यत ताडोबा सुरू करणार नाही असं वनविभाग अधिकारी सांगतात.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 08:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading