कौल जनतेचा...(नगरपालिकेचा निकाल )

कौल जनतेचा...(नगरपालिकेचा निकाल )

14 डिसेंबरसोमवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुकात 168 पैकी 132 नगरपालिकेचे निकाल जाहीर झाले त्यापैकी आज नगरपालिकांच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विदर्भात सगळ्याच पक्षांना लोकांनी कौल दिला. यात विशेष म्हणजे स्थानिक पक्षांच्या नेत्यांवर मतदारांनी विश्वास दाखवला. याठिकाणी काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिकांत राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिला. सांगली जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आर आर पाटील आणि जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पद्मसिंह पाटील यांना उस्मानाबादचा गड राखण्यात यश आलं आहे. पण जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकांमध्ये त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं नाही. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचं आव्हान मोडून काढलं आहे. एकूण नगरपालिकांचा जाहीर निकाल- 176राष्ट्रवादी- 57काँग्रेस-44भाजप- 10शिवसेना-05मनसे-02स्थानिक आघाड्या-37आज दुसर्‍या टप्यात 18 नगरपालिकांचा निकाल जाहीर जिल्हा अहमदनगर एकूण नगरपालिका - 08काँग्रेस- 04 राष्ट्रवादी-02त्रिशंकू- 02 ********************************************** जिल्हा उस्मानाबाद एकूण नगरपालिका- 8राष्ट्रवादी- 3 (-4)काँग्रेस- 3 (+1)शिवसेना- 1महायुती- 1उस्मानाबाद विशेष : जनतेचा कौल... भूम नगरपालिका भूम नगरपालिकेवर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व पुन्हा सिध्द केलं आहे. 17 पैकी 12 जागा मिळवून राष्ट्रवादीने सत्ता जिंकली आहे. 4 जागा सेनेला तर 1 जागा मिळवून मनसेनं या नगरपालिकेत आपलं खातं उघडलं आहे.मुरुम नगरपालिकामुरुम नगरपालिका पुन्हा एकदा काँग्रेसने राखली आहे.औसाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी दिलेलं आव्हान मोडून काढलं आहे. 17 जागांपैकी 15 जागा मिळवून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळविलं आहे. राष्ट्रवादीला फक्त 1 जागी मिळाली तर सेनेलाही एकाच जागा मिळाली आहे. परांडा नगरपालिका - एकूण जागा 17उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेवर सेनेनं आपला झेंडा फडकाविला आहे. राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढून सेनेनं जोरदार मुसंडी मारुन पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळविली आहे.अजित पवार यांचे कडवे समर्थक असलेल्या गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना हा मोठा झटका मानला जातोय.परांडा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे.परांड्यात सेनेची आघाडी आतापर्यंत 9 जागा जिंकल्यात, 4 राष्ट्रवादी, 4 शहर विकास आघाडी (काँग्रेस), - एकूण जागा 17कळंब नगरपालिकाकळंब नगरपालिका काँग्रेसने राष्ट्रवादीकडून खेचण्यात यश मिळविलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला हा धक्का असल्याचं मानलं जातं आहे. 17 पैकी 9 जागी काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यंदा सेनेनंही 3 जागा मिळविल्या आहे. काँग्रेस नगरपालिकेतील गटनेते शिवाजी कापसे यांना या विजयाचे शिल्पकार मानलं जातं आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी जातीने लक्ष देऊनही त्यांना सत्ता राखण्यात अपयश आलं आहे.तूळजापूरला राष्ट्रवादीची सत्ता कायम - 19 जागातूळजापूरला राष्ट्रवादी ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीने सर्व 19 जागा जिंकून त्यांनी विरोधक काँग्रेसला व्हाईट वॉश दिला आहे.या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ.राष्ट्रवादीकडून सत्ता खेचण्यासाठी या निवडणुकीत त्यांनी व्यूहरचनाही केली होती.याकरीता खास त्यांनी आपल्या मतदारसंघात अधिकाधिक वेळही दिला होता. पण राष्ट्रवादीने पुन्हा एकदा बाजी मारत तुळजापूर नगरपरिषद ताब्यात ठेवण्यात यश मिळवून राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी आपलं वर्चस्व सिध्द केलं आहे.उमरगा नगरपरिषद 17 जागाउस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद नव्याने जन्माला आलेल्या महायुतीनं खेचण्यात यश मिळविलं आहे. 17 पैकी 11 जागी महायुतीनं विजय मिळवला आहे.सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 4 जागी यश मिळालं आहे. सेनेचे माजी आमदार रवींद्र गायकवाड यांना या सेना, भाजप आणि रिपाईच्या या महायुतीने मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार मानले जातं आहे. राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्यात असलेल्या दुहीचा फायदा महायुतीला झाल्याने सत्ताधारी आघाडीला त्यांनी या निवडणुकीत धूळ चारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.********************************************** लातूर जिल्हा एकूण नगरपालिका- 3काँग्रेस- 02त्रिशंकू- 1लातूर विशेष : जनतेचा कौल... निलंगा येथे 19 जागेसाठी मतदानमोजणीचे निकाल जाहीर होतं आहे. या निकालात काँग्रेसने 16 जागा तर भाजप 3 जागा मिळाल्या आहे. निलंग्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आपला गड राखला आहे आणि भाजपचे माजी आमदार आणि नातू संभाजी पाटील यांचा दारून पराभव केला आहे. उदगीर 33 जागांसाठी मतदान काँग्रेसला 25 जागेवर विजयी राष्ट्रवादीला 6 जागेवर विजयी भाजप 1 जागेवर विजयी अपक्ष 1 जागेवर विजयी उदगीरमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत.औसा नगरपरिषदेत त्रिशंकू झाली आहे. या ठिकाणी 18 जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात काँगेसला 7 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादीलाही 7 जागा मिळाल्या आहे. भाजपला मात्र 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. आणि शिवसेना केवळ 1 जागा मिळाली आहे. ********************************************** अकोला जिल्हा एकूण नगरपालिका -05राष्ट्रवादी- 01काँग्रेस-01भाजप-01काँग्रेस-राष्ट्रवादी-01स्थानिक आघाडी-1 ********************************************** जिल्हा अमरावती एकूण नगरपालिका 09स्थानिक- 05काँग्रेस-1भाजप-2शिवसेना-01अमरावती विशेष : जनतेचा कौल... अमरावती धामणगावमध्ये भाजपचं वर्चस्व कायम आहे. भाजपने एकूण 17 पैकी 13 जागा जिंकत बहूमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अमरावती मध्ये वरुडचे अपक्ष आमदार अनिल बोंडे यांच्या जनसंग्राम आघाडीने जिल्हातील 3 जागी घवघवीत यश मिळवलं आहे. शिवसेनेने विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर बोंडे वरुडमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आघाडीने शेंदुर्जना घाटमध्ये सत्ता मिळवली, तर मोर्शीमध्ये त्यांच्या आघाडीने 3 तर वरुड पालिकेत 4 जागा मिळाल्या आहेत. कापसाला वाढीव हमी भाव मिळावा म्हणून बोंडेनी विदर्भात आंदोलन केलं होते. त्याचाच फायदा त्यांना मिळाला. ********************************************** चंद्रपूर, बल्लारपूर- नगरपालिका एकूण जागा -32काँग्रेस- 11भाजप- 11काँग्रेसला इतर पक्षांची मदत? विशेष : जनतेचा कौल... चांदूर रेल्वे नगरपरिषदेत राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालीय, गेल्या 10 वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. एकूण 17 जागेपैकी भाजपला 7, काँग्रेसला 4, अपक्षांना 2 ,राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली तर एका जागेचा निकाल जाहीर व्हायचा आहे.********************************************** सांगली जिल्हा एकूण नगरपालिका- 04राष्ट्रवादी- 03काँग्रेस- 01 सांगली विशेष : जनतेचा कौल... सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये राष्ट्रवादीने एकूण 19 पैकी 19 जागा जिंकत नगरपरिषद कायम राखली आहे. काँग्रेसला धूळ चारत आष्टा नगरपरिषद कायम राखली आहे. या विजयामुळे जयंत पाटील यांचा प्रभाव कामय असल्याचं स्पष्ट झालं आहे.********************************************** जिल्हा सातारा 2 नगरपालिकाकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी-1राष्ट्रवादी-1********************************************** जिल्हा सोलापूर मैंदर्गी नगरपालिकास्थानिक आघाडीचं वर्चस्व********************************************** जिल्हा पुणे- दौंड नगरपालिका एकूण जागा- 23स्थानिक आघाडी-19राष्ट्रवादी-04**********************************************

  • Share this:

14 डिसेंबर

सोमवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुकात 168 पैकी 132 नगरपालिकेचे निकाल जाहीर झाले त्यापैकी आज नगरपालिकांच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. विदर्भात सगळ्याच पक्षांना लोकांनी कौल दिला. यात विशेष म्हणजे स्थानिक पक्षांच्या नेत्यांवर मतदारांनी विश्वास दाखवला. याठिकाणी काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिकांत राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिला. सांगली जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आर आर पाटील आणि जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पद्मसिंह पाटील यांना उस्मानाबादचा गड राखण्यात यश आलं आहे. पण जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकांमध्ये त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं नाही. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचं आव्हान मोडून काढलं आहे.

एकूण नगरपालिकांचा जाहीर निकाल- 176

राष्ट्रवादी- 57काँग्रेस-44भाजप- 10शिवसेना-05मनसे-02स्थानिक आघाड्या-37

आज दुसर्‍या टप्यात 18 नगरपालिकांचा निकाल जाहीर

जिल्हा अहमदनगर एकूण नगरपालिका - 08

काँग्रेस- 04 राष्ट्रवादी-02त्रिशंकू- 02

**********************************************

जिल्हा उस्मानाबाद एकूण नगरपालिका- 8

राष्ट्रवादी- 3 (-4)काँग्रेस- 3 (1)शिवसेना- 1महायुती- 1

उस्मानाबाद विशेष : जनतेचा कौल...

भूम नगरपालिका

भूम नगरपालिकेवर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व पुन्हा सिध्द केलं आहे. 17 पैकी 12 जागा मिळवून राष्ट्रवादीने सत्ता जिंकली आहे. 4 जागा सेनेला तर 1 जागा मिळवून मनसेनं या नगरपालिकेत आपलं खातं उघडलं आहे.

मुरुम नगरपालिकामुरुम नगरपालिका पुन्हा एकदा काँग्रेसने राखली आहे.औसाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी दिलेलं आव्हान मोडून काढलं आहे. 17 जागांपैकी 15 जागा मिळवून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळविलं आहे. राष्ट्रवादीला फक्त 1 जागी मिळाली तर सेनेलाही एकाच जागा मिळाली आहे.

परांडा नगरपालिका - एकूण जागा 17

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेवर सेनेनं आपला झेंडा फडकाविला आहे. राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढून सेनेनं जोरदार मुसंडी मारुन पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळविली आहे.अजित पवार यांचे कडवे समर्थक असलेल्या गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहुल मोटे यांना हा मोठा झटका मानला जातोय.परांडा मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे.

परांड्यात सेनेची आघाडी आतापर्यंत 9 जागा जिंकल्यात, 4 राष्ट्रवादी, 4 शहर विकास आघाडी (काँग्रेस), - एकूण जागा 17

कळंब नगरपालिकाकळंब नगरपालिका काँग्रेसने राष्ट्रवादीकडून खेचण्यात यश मिळविलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला हा धक्का असल्याचं मानलं जातं आहे. 17 पैकी 9 जागी काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यंदा सेनेनंही 3 जागा मिळविल्या आहे. काँग्रेस नगरपालिकेतील गटनेते शिवाजी कापसे यांना या विजयाचे शिल्पकार मानलं जातं आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी जातीने लक्ष देऊनही त्यांना सत्ता राखण्यात अपयश आलं आहे.

तूळजापूरला राष्ट्रवादीची सत्ता कायम - 19 जागा

तूळजापूरला राष्ट्रवादी ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीने सर्व 19 जागा जिंकून त्यांनी विरोधक काँग्रेसला व्हाईट वॉश दिला आहे.या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ.राष्ट्रवादीकडून सत्ता खेचण्यासाठी या निवडणुकीत त्यांनी व्यूहरचनाही केली होती.याकरीता खास त्यांनी आपल्या मतदारसंघात अधिकाधिक वेळही दिला होता. पण राष्ट्रवादीने पुन्हा एकदा बाजी मारत तुळजापूर नगरपरिषद ताब्यात ठेवण्यात यश मिळवून राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील यांनी आपलं वर्चस्व सिध्द केलं आहे.

उमरगा नगरपरिषद 17 जागा

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद नव्याने जन्माला आलेल्या महायुतीनं खेचण्यात यश मिळविलं आहे. 17 पैकी 11 जागी महायुतीनं विजय मिळवला आहे.सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 4 जागी यश मिळालं आहे. सेनेचे माजी आमदार रवींद्र गायकवाड यांना या सेना, भाजप आणि रिपाईच्या या महायुतीने मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार मानले जातं आहे. राष्ट्रवादीचे खासदार पद्दसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्यात असलेल्या दुहीचा फायदा महायुतीला झाल्याने सत्ताधारी आघाडीला त्यांनी या निवडणुकीत धूळ चारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

**********************************************

लातूर जिल्हा एकूण नगरपालिका- 3

काँग्रेस- 02त्रिशंकू- 1

लातूर विशेष : जनतेचा कौल...

निलंगा येथे 19 जागेसाठी मतदानमोजणीचे निकाल जाहीर होतं आहे. या निकालात काँग्रेसने 16 जागा तर भाजप 3 जागा मिळाल्या आहे. निलंग्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आपला गड राखला आहे आणि भाजपचे माजी आमदार आणि नातू संभाजी पाटील यांचा दारून पराभव केला आहे.

उदगीर 33 जागांसाठी मतदान काँग्रेसला 25 जागेवर विजयी राष्ट्रवादीला 6 जागेवर विजयी भाजप 1 जागेवर विजयी अपक्ष 1 जागेवर विजयी उदगीरमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत.

औसा नगरपरिषदेत त्रिशंकू झाली आहे. या ठिकाणी 18 जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात काँगेसला 7 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादीलाही 7 जागा मिळाल्या आहे. भाजपला मात्र 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. आणि शिवसेना केवळ 1 जागा मिळाली आहे.

**********************************************

अकोला जिल्हा एकूण नगरपालिका -05

राष्ट्रवादी- 01काँग्रेस-01भाजप-01काँग्रेस-राष्ट्रवादी-01स्थानिक आघाडी-1

**********************************************

जिल्हा अमरावती एकूण नगरपालिका 09

स्थानिक- 05काँग्रेस-1भाजप-2शिवसेना-01

अमरावती विशेष : जनतेचा कौल...

अमरावती धामणगावमध्ये भाजपचं वर्चस्व कायम आहे. भाजपने एकूण 17 पैकी 13 जागा जिंकत बहूमत मिळवलं आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

अमरावती मध्ये वरुडचे अपक्ष आमदार अनिल बोंडे यांच्या जनसंग्राम आघाडीने जिल्हातील 3 जागी घवघवीत यश मिळवलं आहे. शिवसेनेने विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर बोंडे वरुडमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आघाडीने शेंदुर्जना घाटमध्ये सत्ता मिळवली, तर मोर्शीमध्ये त्यांच्या आघाडीने 3 तर वरुड पालिकेत 4 जागा मिळाल्या आहेत. कापसाला वाढीव हमी भाव मिळावा म्हणून बोंडेनी विदर्भात आंदोलन केलं होते. त्याचाच फायदा त्यांना मिळाला.

**********************************************

चंद्रपूर, बल्लारपूर- नगरपालिका एकूण जागा -32

काँग्रेस- 11भाजप- 11काँग्रेसला इतर पक्षांची मदत?

विशेष : जनतेचा कौल...

चांदूर रेल्वे नगरपरिषदेत राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळालीय, गेल्या 10 वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. एकूण 17 जागेपैकी भाजपला 7, काँग्रेसला 4, अपक्षांना 2 ,राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली तर एका जागेचा निकाल जाहीर व्हायचा आहे.

**********************************************

सांगली जिल्हा एकूण नगरपालिका- 04

राष्ट्रवादी- 03काँग्रेस- 01

सांगली विशेष : जनतेचा कौल...

सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये राष्ट्रवादीने एकूण 19 पैकी 19 जागा जिंकत नगरपरिषद कायम राखली आहे. काँग्रेसला धूळ चारत आष्टा नगरपरिषद कायम राखली आहे. या विजयामुळे जयंत पाटील यांचा प्रभाव कामय असल्याचं स्पष्ट झालं आहे.

**********************************************

जिल्हा सातारा 2 नगरपालिकाकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी-1राष्ट्रवादी-1

**********************************************

जिल्हा सोलापूर मैंदर्गी नगरपालिकास्थानिक आघाडीचं वर्चस्व

**********************************************

जिल्हा पुणे- दौंड नगरपालिका एकूण जागा- 23

स्थानिक आघाडी-19राष्ट्रवादी-04

**********************************************

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 03:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading