काकांच्या आशिर्वादाने मिळालेले मंत्रिपद नीट सांभाळा - राज ठाकरे

काकांच्या आशिर्वादाने मिळालेले मंत्रिपद नीट सांभाळा - राज ठाकरे

22 नोव्हेंबरअजितदादांना शरद पवार यांच्या कृपेने मिळालेले उपमुख्यमंत्रीपद नीट सांभाळावे उगाच नको ते खटाटोप करु नये त्यांनी सटॅक आवाज केला तर फटॉक आवाज येणारच असा टोला राज यांनी लगावला. तसेच शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मनसेच्यावतीने घेण्यात येणार्‍या परीक्षेतील सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाईल अशी घोषणाही राज यांनी केली.महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकतं राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची परीक्षा घेणार असं घोषित केलं. राज यांच्या परीक्षेवर विरोधकांनी एकच टीकेची झोड उठवली. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेऊन परिक्षेबद्दल खुलासा केला. ही परीक्षा कोणती आयएपीएसची नाही जर लोकांच्या विकासासाठी निवडणुका लढव्याच्या असतील तर महापालिकेची माहिती उमेदवारांना असणे काय चुकीचे ? उमेदवारांना पालिकेची माहिती असणे गरजेचे आहे यासाठी हा नवा प्रयोग आम्ही करुन पाहत आहोत जर विरोधकांना विरोध करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही असं राज यांनी केला. तसेच या परीक्षेसाठी पालिकेची माहिती पुस्तिकाही उमेदवारांना देण्यात येणार आहे आणि ही परीक्षा खूप सोपी असणार आहे, सर्व परीक्षा देणार्‍या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल असंही राज यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांचे बापजादे क्रिकेट खेळायचे काय ? ह्या राज यांच्या विधानाचा समाचार घेत अजितदादांनी आपले आजोबा सदू शिंदे हे टेस्ट क्रिकेटर होते असा खुलासा दिला होता. अजितदादांच्या खुलास्यावर संशय व्यक्त करत शरद पवारांचे सासरे अजितदादांचे आजोबा कसे असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पवार हे कुस्ती संघटनेवर अध्यक्ष आहे मग उद्या ते दारासिंग यांना सुध्दा आजोबा म्हणतील अशी बोचरी टीका राज यांनी केली. तसेच हे शेतकरी आहे ना मग राज्यभरात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली मग पवार कधी करणार ? शरद पवारांमुळे उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे ते नीट सांभाळावे उगाच नको तो खटाटोप करु नये जर सटॅक आवाज केला तर फट्याक आवाज येईलच असा इशारा राज यांनी दिला.

  • Share this:

22 नोव्हेंबर

अजितदादांना शरद पवार यांच्या कृपेने मिळालेले उपमुख्यमंत्रीपद नीट सांभाळावे उगाच नको ते खटाटोप करु नये त्यांनी सटॅक आवाज केला तर फटॉक आवाज येणारच असा टोला राज यांनी लगावला. तसेच शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर मनसेच्यावतीने घेण्यात येणार्‍या परीक्षेतील सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाईल अशी घोषणाही राज यांनी केली.

महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकतं राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची परीक्षा घेणार असं घोषित केलं. राज यांच्या परीक्षेवर विरोधकांनी एकच टीकेची झोड उठवली. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेऊन परिक्षेबद्दल खुलासा केला. ही परीक्षा कोणती आयएपीएसची नाही जर लोकांच्या विकासासाठी निवडणुका लढव्याच्या असतील तर महापालिकेची माहिती उमेदवारांना असणे काय चुकीचे ? उमेदवारांना पालिकेची माहिती असणे गरजेचे आहे यासाठी हा नवा प्रयोग आम्ही करुन पाहत आहोत जर विरोधकांना विरोध करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही असं राज यांनी केला.

तसेच या परीक्षेसाठी पालिकेची माहिती पुस्तिकाही उमेदवारांना देण्यात येणार आहे आणि ही परीक्षा खूप सोपी असणार आहे, सर्व परीक्षा देणार्‍या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल असंही राज यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांचे बापजादे क्रिकेट खेळायचे काय ? ह्या राज यांच्या विधानाचा समाचार घेत अजितदादांनी आपले आजोबा सदू शिंदे हे टेस्ट क्रिकेटर होते असा खुलासा दिला होता.

अजितदादांच्या खुलास्यावर संशय व्यक्त करत शरद पवारांचे सासरे अजितदादांचे आजोबा कसे असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पवार हे कुस्ती संघटनेवर अध्यक्ष आहे मग उद्या ते दारासिंग यांना सुध्दा आजोबा म्हणतील अशी बोचरी टीका राज यांनी केली. तसेच हे शेतकरी आहे ना मग राज्यभरात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली मग पवार कधी करणार ? शरद पवारांमुळे उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे ते नीट सांभाळावे उगाच नको तो खटाटोप करु नये जर सटॅक आवाज केला तर फट्याक आवाज येईलच असा इशारा राज यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 05:50 PM IST

ताज्या बातम्या