मोलमजुरीकरून त्यांने पटकावले चित्रकलेत लाखाचे पारितोषिक !

शची मराठे, मुंबई 19 नोव्हेंबरचित्रकार व्हायचं म्हणजे तसं खर्चिक काम. म्हणजे चित्रकलेचं कौशल्य असलं तरी चित्र काढण्यासाठी लागणारे रंग, कॅनव्हास या सगळ्यासाठी बरेच पैसे पडतात. तरचं ही कला करिअर म्हणून निवडता येते. अनेक चित्रकार असं म्हणतात की, एका चित्र प्रदर्शनाचा खर्च हा जवळपास एका लग्नाइतका असतो. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत शशीकांत धोत्रे या तरुण चित्रकाराने स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली आणि या वर्षी पहिल्यांदाच मुंबईतल्या नेहरु सेंटर इथं भरलेल्या इंडियन आर्ट फेस्टिव्हलमध्ये 1 लाखाचे पारितोषिकदेखील पटकावलं. शाबासकीची थाप,अभिनंदनाचे फोन्स कॉल्स आणि कौतुकाचा वर्षाव यामुळे शशीकांत हरखून गेला होता. भारतीय कला महोत्सवाचा उल्लेखनीय चित्रकार म्हणून तब्बल 1 लाखाचा पुरस्कार या उमद्या चित्रकाराला मिळाला. पण या झगमगाटातदेखील शशीकांत आपलं 22 वर्षांचे स्टगल विसरला नाही. शशीकांत म्हणतो, 8-9 वर्षांचा होतो त्यावेळी वडील ठेकेदारी करायचे त्यांच्या हिशेबाच्या वहीत मोर होता, तो पाहिला की मला काहीतरी व्हायचं मला आठवतोय मी तो मोर काढायचो. आणि मग याच मोरानं शशीकांतला चित्रकलेचं वेड लावलं. या वेडापायी मी 10 वीत नापास झालो, 18 विश्व दारिद्र, नापास झाल्यानंतर मोलमजुरी करायला लागलो, अक्षरक्ष: ट्रकवर माती उचलणे, बिगारी काम, पण चित्रकला शिकायची होती. जेजेबद्दल कळलं तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तयारी सुरु केली. ऍडमिशन तर मिळाली पण पैशाअभावी जेजेतून शिक्षण घ्यायचं स्वप्न अर्ध्यातचं भंगलं, पण त्याची जिद्द मात्र अजूनही त्याच्याबरोबर होती. 2008 मध्ये आर्ट सोसायटीची स्पर्धा होती सामान घ्यायला पैसेचं नव्हते. काळा कागद, पेन्सिलनं चित्र काढलं आणि पाठवून दिलं त्याला बक्षिस मिळाले, आणि आत्मविश्वास माझा वाढला. काळा कागद आणि रंगीत पेन्सिल्स इतकचं साहित्य. कलेच्या कोणत्याही शिक्षणाशिवाय गवसलेल्या या स्टाईलनंचे शशीकांतला चारचौघा चित्रकारांपेक्षा वेगळं ठरवलं. शशीकांत म्हणतो, ऑईल, वॉटर कलर्स हे मी शिकलोच नाही मला ते सगळं कधी मिळालचं नाही. पेन्सिलचं मिळालीचं हातात. म्हणूनच तिच्यामुळे इथंपर्यंत आला. कधी काळी दगड विटा आणि मांतीमध्ये मळलेल्या याचं हातात आज ब्रश, रंग आणि कागद आहेत आणि डोळ्यात आहे एक मोठ्ठा चित्रकार होण्याचं स्वप्न..

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2011 12:01 PM IST

मोलमजुरीकरून त्यांने पटकावले चित्रकलेत लाखाचे पारितोषिक !

शची मराठे, मुंबई

19 नोव्हेंबर

चित्रकार व्हायचं म्हणजे तसं खर्चिक काम. म्हणजे चित्रकलेचं कौशल्य असलं तरी चित्र काढण्यासाठी लागणारे रंग, कॅनव्हास या सगळ्यासाठी बरेच पैसे पडतात. तरचं ही कला करिअर म्हणून निवडता येते. अनेक चित्रकार असं म्हणतात की, एका चित्र प्रदर्शनाचा खर्च हा जवळपास एका लग्नाइतका असतो. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत शशीकांत धोत्रे या तरुण चित्रकाराने स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली आणि या वर्षी पहिल्यांदाच मुंबईतल्या नेहरु सेंटर इथं भरलेल्या इंडियन आर्ट फेस्टिव्हलमध्ये 1 लाखाचे पारितोषिकदेखील पटकावलं.

शाबासकीची थाप,अभिनंदनाचे फोन्स कॉल्स आणि कौतुकाचा वर्षाव यामुळे शशीकांत हरखून गेला होता. भारतीय कला महोत्सवाचा उल्लेखनीय चित्रकार म्हणून तब्बल 1 लाखाचा पुरस्कार या उमद्या चित्रकाराला मिळाला. पण या झगमगाटातदेखील शशीकांत आपलं 22 वर्षांचे स्टगल विसरला नाही.

शशीकांत म्हणतो, 8-9 वर्षांचा होतो त्यावेळी वडील ठेकेदारी करायचे त्यांच्या हिशेबाच्या वहीत मोर होता, तो पाहिला की मला काहीतरी व्हायचं मला आठवतोय मी तो मोर काढायचो.

आणि मग याच मोरानं शशीकांतला चित्रकलेचं वेड लावलं. या वेडापायी मी 10 वीत नापास झालो, 18 विश्व दारिद्र, नापास झाल्यानंतर मोलमजुरी करायला लागलो, अक्षरक्ष: ट्रकवर माती उचलणे, बिगारी काम, पण चित्रकला शिकायची होती. जेजेबद्दल कळलं तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तयारी सुरु केली. ऍडमिशन तर मिळाली पण पैशाअभावी जेजेतून शिक्षण घ्यायचं स्वप्न अर्ध्यातचं भंगलं, पण त्याची जिद्द मात्र अजूनही त्याच्याबरोबर होती.

2008 मध्ये आर्ट सोसायटीची स्पर्धा होती सामान घ्यायला पैसेचं नव्हते. काळा कागद, पेन्सिलनं चित्र काढलं आणि पाठवून दिलं त्याला बक्षिस मिळाले, आणि आत्मविश्वास माझा वाढला. काळा कागद आणि रंगीत पेन्सिल्स इतकचं साहित्य. कलेच्या कोणत्याही शिक्षणाशिवाय गवसलेल्या या स्टाईलनंचे शशीकांतला चारचौघा चित्रकारांपेक्षा वेगळं ठरवलं.

शशीकांत म्हणतो, ऑईल, वॉटर कलर्स हे मी शिकलोच नाही मला ते सगळं कधी मिळालचं नाही. पेन्सिलचं मिळालीचं हातात. म्हणूनच तिच्यामुळे इथंपर्यंत आला.

कधी काळी दगड विटा आणि मांतीमध्ये मळलेल्या याचं हातात आज ब्रश, रंग आणि कागद आहेत आणि डोळ्यात आहे एक मोठ्ठा चित्रकार होण्याचं स्वप्न..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...