कॅश फॉर व्होट प्रकरणी सर्व आरोपींना जामीन

16 नोव्हेंबरकॅश फॉर व्होटप्रकरणी सर्वच्या सर्व पाच आरोपींची आज कोर्टाने जामिनावर सुटका केली. भाजपच्या खासदारांविरोधात लाच घेतल्याचे पुरावे नाहीत, असं मत कोर्टानं नोंदवलं आहे.'मी संपूर्ण चार्जशीट बारकाईनं तपासली. पण मला भाजपच्या तीन खासदारांनी लाच मागितल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.' - न्या. एम. एल. मेहता, दिल्ली हायकोर्ट 2008 च्या कॅश फॉर व्होट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. एल. मेहता यांचं हे मत. 2008 च्या विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी यूपीए सरकारने मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. याप्रकरणी अटक केलेल्या 5 आरोपींना बुधवारी दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला. भाजपचे माजी खासदार फग्गनसिंग कुलस्ते, महावीर भगोडा आणि लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी गुरुवारी तुरुंगाबाहेर पडतील. भाजपचे खासदार अशोक अर्गल यानांही कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.2008 मध्ये सीएनएन-आयबीएनने या प्रकरणाचं स्टींग ऑपरेशन केलं होतं. सीएनएन-आयबीएनने सादर केलेल्या टेप्समधल्या ऑडिओ किंवा व्हिडिओशी छेडछाड झाली नसल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आली भूमिका अचानक बदलली. आरोपींच्या जामिनाला सुरुवातीला विरोध करणार्‍या दिल्ली पोलिसांनी नंतर आपली हरकत नसल्याचं स्पष्ट केलं. याप्रकरणी काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. - कॅश फॉर व्होट प्रकरणातले पैसे कुठून आले हे स्पष्ट करणं दिल्ली पोलिसांना का जमलं नाही?- याप्रकरणी पहिली अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ का लागला?आरोपींना जामीन मंजूर करताच लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी लगेच ट्वििट केलं. आपल्या खासदारांनी काहीच चुकीचं केलं नाही. केवळ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, आणि यापुढेही आपण लढत राहू, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2011 09:36 AM IST

कॅश फॉर व्होट प्रकरणी सर्व आरोपींना जामीन

16 नोव्हेंबर

कॅश फॉर व्होटप्रकरणी सर्वच्या सर्व पाच आरोपींची आज कोर्टाने जामिनावर सुटका केली. भाजपच्या खासदारांविरोधात लाच घेतल्याचे पुरावे नाहीत, असं मत कोर्टानं नोंदवलं आहे.'मी संपूर्ण चार्जशीट बारकाईनं तपासली. पण मला भाजपच्या तीन खासदारांनी लाच मागितल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.' - न्या. एम. एल. मेहता, दिल्ली हायकोर्ट 2008 च्या कॅश फॉर व्होट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. एल. मेहता यांचं हे मत. 2008 च्या विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी यूपीए सरकारने मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. याप्रकरणी अटक केलेल्या 5 आरोपींना बुधवारी दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला. भाजपचे माजी खासदार फग्गनसिंग कुलस्ते, महावीर भगोडा आणि लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी गुरुवारी तुरुंगाबाहेर पडतील. भाजपचे खासदार अशोक अर्गल यानांही कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.2008 मध्ये सीएनएन-आयबीएनने या प्रकरणाचं स्टींग ऑपरेशन केलं होतं. सीएनएन-आयबीएनने सादर केलेल्या टेप्समधल्या ऑडिओ किंवा व्हिडिओशी छेडछाड झाली नसल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आली भूमिका अचानक बदलली. आरोपींच्या जामिनाला सुरुवातीला विरोध करणार्‍या दिल्ली पोलिसांनी नंतर आपली हरकत नसल्याचं स्पष्ट केलं. याप्रकरणी काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. - कॅश फॉर व्होट प्रकरणातले पैसे कुठून आले हे स्पष्ट करणं दिल्ली पोलिसांना का जमलं नाही?- याप्रकरणी पहिली अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ का लागला?आरोपींना जामीन मंजूर करताच लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी लगेच ट्वििट केलं. आपल्या खासदारांनी काहीच चुकीचं केलं नाही. केवळ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, आणि यापुढेही आपण लढत राहू, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...