लोकपाल समितीत दलित सदस्य असावा - आठवले

लोकपाल समितीत दलित सदस्य असावा - आठवले

03 नोव्हेंबररिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवलेंनी आज अण्णांची भेट घेतली. यावेळी लोकपाल विधेयकाच्या समितीत दलित प्रतिनिधी असावेत अशी मागणी आता सरकारकडे करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी अण्णांना महायुतीचा पाठिंबाच आहे असंही आठवलेंनी म्हटलं. दरम्यान अण्णा उद्या दिल्लीला जाणार आहेत. संसदेच्या स्थायी समितीसमोर अण्णा आपलं म्हणणं उद्या मांडणार आहेत. पण मौन सोडण्याबद्दल अद्याप निर्णय नाही. अण्णा दिल्लीत मौन सोडणार की राळेगणमध्ये मौन सोडणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. अण्णांचे सहकारी मनिष सिसोदिया आज दुपारी राळेगणमध्ये येणार आहेत. अण्णांसोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवारही अण्णांना भेटणार आहेत दरम्यान, लोकपाल विधेयकासंदर्भात आज संसदेच्या स्थायी समिती आणि टीम अण्णामध्ये आज बैठक होतेय. स्थायी समितीची आज आणि उद्या दोन दिवस बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजूर करावे नाही तर व्यापक आंदोलन करु असा इशारा टीम अण्णांनी दिलाय. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं याकडे लक्ष असेल.

  • Share this:

03 नोव्हेंबर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवलेंनी आज अण्णांची भेट घेतली. यावेळी लोकपाल विधेयकाच्या समितीत दलित प्रतिनिधी असावेत अशी मागणी आता सरकारकडे करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी अण्णांना महायुतीचा पाठिंबाच आहे असंही आठवलेंनी म्हटलं. दरम्यान अण्णा उद्या दिल्लीला जाणार आहेत. संसदेच्या स्थायी समितीसमोर अण्णा आपलं म्हणणं उद्या मांडणार आहेत. पण मौन सोडण्याबद्दल अद्याप निर्णय नाही.

अण्णा दिल्लीत मौन सोडणार की राळेगणमध्ये मौन सोडणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. अण्णांचे सहकारी मनिष सिसोदिया आज दुपारी राळेगणमध्ये येणार आहेत. अण्णांसोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवारही अण्णांना भेटणार आहेत

दरम्यान, लोकपाल विधेयकासंदर्भात आज संसदेच्या स्थायी समिती आणि टीम अण्णामध्ये आज बैठक होतेय. स्थायी समितीची आज आणि उद्या दोन दिवस बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजूर करावे नाही तर व्यापक आंदोलन करु असा इशारा टीम अण्णांनी दिलाय. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतं याकडे लक्ष असेल.

First published: November 3, 2011, 9:18 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading